मयुर भोसले यांच्या जागतिक उपक्रमामुळे न्यायाधीशांच्या हस्ते सन्मान

0
573

जामखेड न्युज——

मयुर भोसले यांच्या जागतिक उपक्रमामुळे न्यायाधीशांच्या हस्ते सन्मान

 

अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होणे ही एक अभिमानाची बाब असून जामखेडचे तसेच रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय चे नाव रेकॉर्डच्या माध्यमातून जागतिक पटलावर चमकले असून यातून जामखेडची नवी ओळख निर्माण झाली आहे. असे मनोगत अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची पाहणी करताना न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी व्यक्त केले. 

अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड ची नोंद झाली हा उपक्रम 26 जानेवारी 2024 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न झाला.

जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये साकार झाले आहे. यामध्ये 2500 विद्यार्थी व 17 महाराष्ट्र बटालियनची एनसीसी कॅडेट सहभागी झाले त्याचे मोजमाप लांबी 240 रुंदी 225 फूट आहे. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालय परिसरात साकारले कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी ते साकारले. अशिया बुक ऑफ रेकॉर्डने 19 मार्च 2024 रोजी निश्चित केले आहे.

अशी नोंद झाली वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या बद्दल जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची पाहणी करून या संदर्भात सविस्तर चर्चा केली. मयुर भोसले यांनी रेकॉर्ड विषयाची संपूर्ण माहिती न्यायाधीश साहेबांना दिली.

मार्गदर्शन करताना न्यायाधीश म्हणाले की
ज्ञानदानाच्या कार्यांबरोबरच जागतिक पातळीचे उपक्रम घेऊन जामखेड तालुक्याच्या वैभवात भर टाकण्याचे कार्य श्री नागेश विद्यालयाने केले आहे. उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक व विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले.

अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साकारल्याबद्दल कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांचा न्यायाधीश यांच्या शुभहस्ते मेडल, प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला.

तसेच विद्यालयाचे वतीने न्यायाधीश जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक साळुंखे बी एस, संतोष पवार ,संभाजी इंगळे ,शिंदे बी एस व न्यायालयीन स्टाफ कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here