जामखेड तहसील कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा कारवाई झाली तरी टँकर सुरूच ठेवणार – आमदार रोहित पवार

0
927

जामखेड न्युज——

जामखेड तहसील कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा

कारवाई झाली तरी टँकर सुरूच ठेवणार – आमदार रोहित पवार

 

 

तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई मुळे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले मोफत पाण्याचे टँकर प्रशासनाकडून अचानक बंद करण्याचे आदेश आले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच अनुषंगाने बंद केलेले टँकर पुन्हा सुरू करावेत या मागणीसाठी आज महिलांच्या वतिने जामखेड तहसील कार्यालयावर भव्य असा हंडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त महिलांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. यावेळी आ. रोहित पवार यांनी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल पण एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यात पाण्याचे मोफत टँकर सुरूच रहाणार आसे अश्वासन महिलांना फोन वरून दिले.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ग्रामीण भागातील गावांमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील उन्हाळ्यात हे पिण्याच्या पाण्याचे टँकर या संस्थेकडून सुरू करण्यात आले होते. सध्या जामखेड तालुक्यात भिषण पाणी टंचाई सुरू आसुन संतप्त महीलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सध्या आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, जणावरांचा पिण्यासाठी पाणी नाही, पाण्यासाठी महीलांना तीन चार कीमी वरुन डोक्यावर हंडा घेऊन पाणी अणावे लागत आहे. विशेषता महीलांचे पाणी आणण्यासाठी हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुनही शासनाकडून अद्याप शासकीय टँकर सुरू नाही.

प्रशासनाकडून टँकर सुरू नसले तरी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील आनेक गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र प्रशासना कडुन सुरु आसलेले पाण्याचे टँकर बंद केले आहेत ते तातडीने सुरू करावे याच बरोबर शासनाकडुन देखील तातडीने टँकर सुरू करावेत अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन महिलांकडुन करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे.

जामखेड तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीरींचे सर्वाधिक प्रस्ताव मंजूर झाले मात्र राजकीय दबावाला बळी पडून मंजुर झालेल्या विहीरींच्या या प्रस्तावाला चौकशीची भीती दाखवून विहीरींचा विषय मुद्दाम रेंगाळत ठेवला आहे आणि शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे ते तातडीने बंद करावे आसे देखील कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्राध्यापक राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, माजी सभापती दीपक पवार पाटील, शहाजी काका राळेभात, काकासाहेब कोल्हे, जामखेड शहराध्यक्ष वशिम शेख, सागर कोल्हे,प्राध्यापक अरुण गाडेकर सर, माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, चांद तांबोळी, राजू गोरे, प्रकाश काळे, प्रदिप धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत, सरपंच सुभाष माने, हरिभाऊ आजबे, नितीन ससाने, माजी सभापती सुधीर राळेभात, पाटील, प्रशांत राळेभात पाटील, दत्तात्रय सोले पाटील, सिद्धेश्वर लटके, अजिनाथ कुमटकर, मोहन भोसले, रामहरी गोपाळघरे, गणेश म्हस्के, बाळासाहेब खैरे, अशोक पठाडे, भाऊ कसरे, श्रीकांत लोखंडे महालिंग कोरे, मोहन पवार, माजी सरपंच सौ.अंजली लक्ष्मण ढेपे सह शेकडो महीला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

कारवाई केली तरी टँकर सुरूच ठेवणार – आमदार रोहित पवार

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना महीलांनी निवेदन दिले व प्रशासनाकडु टँकर सुरू करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. मात्र प्रशासनाकडु टँकर सुरू करण्यासाठी वेळ लागु शकतो त्यामुळे आंदोलनकर्यां महीलांनी आ. रोहित (दादा) पवार यांना मोबाईलवर फोन लावुन टँकर सुरू ठेवण्यास सांगितले. यावेळी आ. रोहित पवार यांनी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल पण एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यात पाण्याचे मोफत टँकर सुरूच रहाणार आसे अश्वासन महीलांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here