अनाथांना आश्रय देण्यासाठी वसतीगृह बांधण्याचा बाफना परिवाराने दिलेला शब्द खरा दोन रूम वसतीगृहाचे लोकार्पण संपन्न

0
1036

जामखेड न्युज——

अनाथांना आश्रय देण्यासाठी वसतीगृह बांधण्याचा बाफना परिवाराने दिलेला शब्द खरा

दोन रूम वसतीगृहाचे लोकार्पण संपन्न

जामखेड परिसरात समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या बाफना परिवारातील युवा उद्योजक आकाशजी बाफना यांनी आपली मुलगी क्रिशाचा पहिला वाढदिवस मोहा फाटा येथील समता भूमी निवारा बालगृहात साजरा केला होता. यावेळी निवारा बालगृहात असणाऱ्या अनाथ मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र रूम नाहीत ही अडचण लक्षात घेऊन मुलींसाठी दोन रूमचे वसतीगृह बांधण्याचा संकल्प केला होता.

आकाशजी बाफना यांनी लगेच दोन रूम वसतीगृह बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. आज ते बांधकाम पूर्ण झाले आहे या रूमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामुळे अनाथांना आश्रय देण्याचे पवित्र काम बाफना परिवारातील आकाशजी बाफना यांनी केले आहे. यामुळे अनाथ मुलींना मोठा आधार प्राप्त झाला आहे. हक्काचा निवारा उपलब्ध झाला आहे. 


यामध्ये वीस मुलींसाठी कायमस्वरूपी राहण्याची सोय झालेली आहे. परिसरातील अनाथ निराधार मुलांना आश्रय देण्याचे काम अँड डॉ. अरूण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा फाटा येथील समता भूमी निवारा बालगृहात सुरू आहे. बाफना परिवाराने मुलीच्या वाढदिवशी दोन रूम वसतीगृह बांधण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण केला आहे यामुळे आनाथांना आश्रय देण्याचे काम बाफना परिवाराने केले आहे. यामुळे बाफना परिवाराने कौतुक होत आहे.


दोन रूम वसतीगृहचा लोकार्पण सोहळा तसेच युवा उद्योजक आकाश बाफना व रोशनजी बाफना यांनी आपला वाढदिवस निवारा बालगृहात चिमुकल्या सोबत साजरा केला.


यावेळी संस्थेचे संस्थापक अँड डॉ. अरुण आबा जाधव, संस्थेचे व्यवस्थापक संतोष चव्हाण, अनभुले सर व संस्थेचे सर्व सहकारी मित्र सर्वांनी हार्दिक आभार मानले.


यावेळी उपस्थित एन महेश चे संचालक महेश जी नगरे , दिलीप काका बाफना, अभय जी बाफना, गौतम दादा बाफना, मिथुन शेठ बाफना, अनिल शेठ बाफना, कृष्णराव चव्हाण सर, परशुरामजी भांगे ,अशोक कुमटकर, गणेश भवर, बाळासाहेब नवसरे, यश भंडारी, निलेश देशमुख, दत्तात्रय जगताप व बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच सेवा भावी बाफना परिवार मधील सर्व महिला वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here