जामखेड न्युज——
बेलापूरची पाटील प्रणाली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
जामखेड महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
स्वातंत्र्य सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी जामखेड महाविद्यालय व ल.ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन मा. डॉ. अरुण अडसूळ (माझी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ )यांच्या उपस्थितीत झाले तर दुपारच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या वकृत्व स्पर्धेसाठी सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणाई, व्यवस्था बदलाचा राजमार्ग….. मताधिकार, कृषी क्षेत्राची सद्यस्थिती आणि आव्हाने, राजकारणाची बदलती दिशा, कृत्रिम बुद्धिमत्ता. मानवी प्रज्ञाला आव्हान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वास्तव व अपेक्षा हे विषय देण्यात आले होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.भास्कर मोरे ,प्रा.सुखदेव कोल्हे, प्रा. डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कुमारी पाटील प्रणाली कला वाणिज्य महाविद्यालय बेलापूर, तर द्वितीय क्रमांक मोहिते आकाश दत्तात्रय न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज अहमदनगर, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खरात स्वप्निल सोपान माणिकचंद चहाडे विधी महाविद्यालय, संभाजीनगर यांना मिळाले. उशीर महेश जनार्धन व किंबहुणे अक्षता यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मा.श्री उद्धवबापू देशमुख यांनी विजेत्या विद्यार्थीना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विजेत्या विद्यार्थीचे अभिनंदन केले.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास ७००१ रुपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास ५००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय क्रमांकास ३००१ रूपये व स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र उत्तेजनार्थ १००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, उत्तेजनार्थ १००१ रूपये स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे बक्षिसे ठेवण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण सायंकाळी झाले.
स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमास दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेडचे अध्यक्ष मा. उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष श्री. अरुण काका चिंतामणी, सचिव श्री. शशिकांत देशमुख, खजिनदार मा. श्री. राजेश मोरे, संचालक मा. श्री. अशोक शेठ शिंगवी, प्राचार्य मा. श्री. डोंगरे सर व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डोंगरे सर यांनी केले तर आभार प्रा. फलके सर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. पेटकर सर , प्रा.भाकरे सर यांनी केले.
सांस्कृतिक विभाग सदस्य व संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होण्यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले.