जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी ए के सुपरकिंग, अंतिम सामन्यात तीन गडी राखून विजय

0
543

जामखेड न्युज——

जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी ए के सुपरकिंग, अंतिम सामन्यात तीन गडी राखून विजय

 

मागील पाच दिवसापासून चालू असलेला जामखेड प्रिमियर लिगच्या अंतिम सामन्यात A R वॉरियर्स आणि A K सुपर किंग्समध्ये चुरशीची लढत झाली.
सहा षटकांच्या या सामन्यात ए आर वॉरियर्सच्या 52 धावा ए के सुपरकिंगने पाच षटकात पार करून युनिव्हर्सल स्पोर्ट्सचा जामखेड प्रिमियर लिगचा पहिला मानकरी ठरला.

युनिव्हर्सल स्पोर्ट्स आयोजित जामखेड प्रीमियर लीग सारोळा रस्त्याच्या काझी मैदानावर दि. २६ जानेवारी पासून अयोजीत केला होता. पाच दिवस आठ संघात साखळी सामने प्रत्येकी सहा षटकांचा होऊन अंतिम सामना संघमालक असलेल्या युनिटी हॉस्पिटलचा ए के सुपरकिंग संघ व आर जे मेन्सवेअर संघमालकाचा ए आर वॉरियर्स यांच्यात झाला. यावेळी दानिश पठाण यांनी नाणेफेक केली ए के सुपरकिंग संघांनी फलंदाजीचा निर्णय घेतला दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख उद्योगपती दिलीप गुगळे यांनी करून घेतली यानंतर सामन्याला सुरवात झाली.

प्रथम फलंदाजी करताना ए आर वॉरियर्स या संघाने सहा षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यामध्ये ५२ धावा केल्या होत्या तर ए के सुपरकिंग या संघाने हे आव्हान ५.१ षटकामध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण केले व जामखेड प्रिमियर लीगचा मानकरी ठरला. या संघास युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या वतीने २१ हजार बक्षिस व ट्राफी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते देण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या ए आर वॉरियर्स संघाला ११ हजार व ट्राफी देण्यात आली. या सामन्यात ए के सुपरकिंगचा तुकाराम जाधव सामनावीर ठरला त्याने 2 ओव्हर्स मध्ये 15 धावा खर्च करत 4 फलंदाज बाद केले. तर उपविजेता ठरलेल्या संघातील मुनाफ शेख याने हॅटट्रिक घेत 2 ओव्हर्स मध्ये 22 धावा खर्च करत 3 बळी घेत एकाकी झुंज दिली.

आ. रोहित पवार यांनी प्रिमियर लीग मध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मेघराज बहीर ( A K सुपर किंग्स )
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज
बप्पा लटके ( A R वॉरियर्स )
स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीर
सागर इंगळे ( रायझिंग स्टार्स क्रिकेट क्लब जामखेड ) यांना सायकल व युनिव्हर्सल स्पोर्ट्सच्या वतीने संघासाठी वैयक्तिक कामगिरी केली त्यांना ट्राफी देऊन सन्मानित केले.

युनिव्हर्सल स्पोर्ट जामखेड अयोजीत जामखेड प्रिमियर लिगची संकल्पना अजित घायतडक, अमिर काझी, कपिल राऊत, सुरज निमोणकर यांनी प्रत्यक्षात आणली. प्रिमियर लीगसाठी जामखेड शहर व तालुक्यातून ५०० खेळाडूंनी फॉर्म भरले होते त्यापैकी १०४ खेळाडू निवडण्यात आले. विविध टिमच्या आठ मालकांनी आपापल्या संघासाठी १३ खेळाडू या १०४ खेळाडूमधून बोली लावून निवडले होते. जामखेड प्रिमियर लिग यशस्वी करण्यासाठी नगरसेवक बिभीषण धनवडे, ऋषिकेश मोरे, साहील भंडारी, निखिल अवारे, योगेश हुलगुंडे, गौरव समुद्र आदींनी परिश्रम घेतले.


चौकट
प्रा. मधुकर राळेभात – युनिव्हर्सल स्पोर्ट्सने प्रथमच आयपीएल प्रमाणे जामखेड प्रिमियर लिग भरवून खेळाडूंना एक नवीन दिशा दाखवून दिली. खेळाडूंनी यापुढे मेहनत घेऊन दररोज सराव करावा यामुळे त्यांचा व्यायम होईल व मोबाईल मधून मुक्तता मिळेल व आपले उद्दिष्ट साध्य करतील. शहर व तालुक्यातील दाते, संस्थाचालक यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त क्रिकेट सामने भरवून प्रोत्साहन द्यावे जेणेकरून पुढील काळात आपले खेळाडू रणजी, कसोटी, एकदिवसीय सामने, वीस षटकांचे सामने यामध्ये दिसतील यासाठी मेहनत घेतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here