जामखेड न्युज——
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्र मंडळाच्या वतीने जामखेडमध्ये कारसेवकांचा सन्मान व महाप्रसाद वाटप संपन्न
जामखेड तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे सतरा कारसेवकांचा सन्मान तसेच श्रीराम मंदिर आयोध्या राष्ट्रापण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुमारे पाच हजार लाडूंचा महाप्रसाद म्हणून वाटप शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कारसेवक व तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातून पन्नास पेक्षा जास्त कारसेवक आयोध्या या ठिकाणी बाबरी मशीद ढाच्या पाडण्यासाठी उपस्थित होते. आज श्रीराम मंदिर आयोध्या राष्ट्रापण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जामखेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी सकाळीच भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र गोवा मुंबई क्षेत्र विश्व हिंदू परिषद बजिरंग दल संयोजक विवेक कुलकर्णी, उमेश देशमुख, बिभीषण धनवडे, हवाशेठ सरनोबत, मोहन गडदे, कैलास जाधव, शाहुराव जायभाय, बाबासाहेब डुचे, तुषार बोथरा, दत्तात्रय पवने, चत्रभुज ढोले, अर्जुन मुळे, प्रताप काशिद, सुनील कदम, संतराम गिरी, बाबासाहेब जाधव, बबन फुंदे, रासकर नाना, अर्जुन फुंदे, अभिमन्यू पवार, अवि बेलेकर, दिपक सुरसे, अमोल तातेड, बाळासाहेब दळवी, शिवसेचे मोहन जाधव, विठ्ठल ओमासे, प्रल्हाद मुळे, बाबासाहेब जायभाय, जालू काळे, कांतीलाल निकम, सोहम जायगुडे, रणजित सुराणा, प्रणव कुलकर्णी, संजय बेलेकर, किरण भुजबळ, दिनकर काशिद, जावळे सर, राजाभाऊ कुलकर्णी, गुड्डू विटकर, सुर्यकांत मुळे, विजय गौड, मयूर भोसले, शहाजी बोराटे, संजय बेरड, सुग्रीव काशिद यांच्या सह कारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारसेवकांनी बाबरी ढाचा पाडण्याचा आपला थरारक अनुभव कथन केला. सुग्रीव काशिद म्हणाले मी बाबरी ढाच्यावर चढून ढाचा पाडत होतो माझ्या पायाला टिकाव लागले. आजही पायाला वण आहे.
सुत्रसंचालन केशवराज कोल्हे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वाना लाडूच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.