जामखेड न्युज——
कामदार आमदार रोहित पवार यांच्या पाठिशी तरूणांनी ठामपणे उभे राहावे – रमेश आजबे
अडीच वर्षात कर्जत जामखेडचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या आमदार रोहित पवार यांना सरकारकडून मुद्दाम त्रास
अडीच वर्षात कर्जत जामखेड चा चेहरामोहरा बदलवणाऱ्या आमदार रोहित पवार यांना सरकार जाणून बुजून त्रास देत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून संघर्ष यात्रा काढली संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व म्हणून आमदार रोहित पवार यांच्या कडे पाहिले जात आहे. म्हणून सरकारने बारामती अँग्रोवर धाडीचा डाव फसला म्हणून आता परत आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तेव्हा २४ तारखेला आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केले आहे.
जामखेड न्युजशी बोलताना रमेश आजबे यांनी सांगितले की, आज आपल्याला आव्हान करू इच्छितो की 2019 च्या कर्जत जामखेड निवडणुकीमध्ये आमदार रोहित दादा पवार यांचा 43 हजार मतांनी विजयी झाला हा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार या राज्यात आलं सरकार आल्यानंतर दोन वर्ष कोरोनाचा कालखंड असताना सुद्धा या कर्ज जामखेडचे भाग्यविधाते रोहित दादा पवार यांनी कामाचा मोठा सपाटा चालू ठेवला या कामांमध्ये जामखेड सांगायचं झालं तर शासकीय विश्रामगृह, एसटी स्टँड, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीचे रहिवासाची बिल्डिंग, पोलीस वसाहत, नवीन नगरपरिषद जामखेड, नाना नानी पार्क, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोठी अभ्यासिका गोरगरिबांना स्वस्त दरामध्ये लग्नासाठी किंवा लग्न जमवण्याच्या कार्यक्रमासाठी स्वस्त दरामध्ये हॉल 50 कोटीचा उपजिल्हा रुग्णालय जामखेड मध्ये तसेच महसूल साठी राहण्यासाठी व आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठं निवास यासारख्या अनेक सरकारी निवास सरकारी बिल्डिंग हे या मतदारसंघात चालू आहे.
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून भव्य अशी एमआयडीसी प्रस्ताव सादर केला पण सरकारने विरोधासाठी विरोध म्हणून विरोधच करत आहे.
तसेच मतदारसंघात मोठे डांबर रस्ते कर्जत जामखेड मध्ये 1800 किलोमीटरचे पानंद रस्ते सुसज्ज स्मशानभूमी तसेच जामखेडच ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे सुसज्ज सिमेंट रोड शहरांमध्ये ट्रॅफिक निर्माण होणार नाही यासाठी शहराच्या साईटने सिमेंट रोड 169 कोटीची उजनी वरून पिण्याच्या पाण्याची योजना सत्तर कोटीची जामखेड शहरांमध्ये भूमिगत गटारीची योजना जामखेड शहरातून जाणारा फोर लेन सिमेंट रोड आशा असंख्य योजना घरोघरी फिरता दवाखाना तसेच शासकीय मोठ्या प्रमाणात घरोघरी योजना या राबवल्या गेल्या एकंदरीत कर्जत जामखेड मतदार संघाचे नाव राज्यात झळकायला लागले.
त्यामुळे माझी तमाम कर्जत जामखेड कर जनतेला व्हिजन असलेल्या आमदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी आव्हान करत आहे तसेच आमदार रोहित दादा पवार यांनी काढलेली संघर्ष यात्रा या संघर्ष यात्रेमध्ये युवकांचे प्रश्न नोकर भरतीचे प्रश्न तसेच शेतीमालाला हमीभाव अशा विविध प्रकारच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष प्रामुख्याने वेधले गेले यामध्ये सरकारच्या लक्षात आलं एक युवा आमदार झाल्यानंतर एकाच टर्ममध्ये एवढं सगळं करू शकतो हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत झाल्यानंतर आम्ही आतापर्यंत पाच पाच चार चार दहा टर्म या ठिकाणी आमदार मंत्री म्हणून काम केलं मग कुठेतरी आमचा कमीपणा होईल म्हणून एका वाईट हेतूने बारामती अग्रो कंपनीवर पाठीमागच्या चार महिन्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून दोन युनिट बंद ठेवावे यासाठी प्रयत्न केले परंतु मेहरबान कोर्टाने त्यामध्ये बारामती अग्रोला दिलासा दिला.
त्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की आपला डाव फसला गेला म्हणून ईडी सारख्या कार्यालयाकडून बारामती ऍग्रो टाकण्यात आली आणि या धाडीमध्ये येणारा 24 तारखेला आमदार रोहित दादा पवार यांना मुंबई ईडी कार्यालयामध्ये हजर राहावे अशी या ठिकाणी नोटीस दिली कारण की हा चेहरा जर पुढे गेला तर भविष्यात खूप मोठी अडचण ठरू शकतो म्हणून जाणून-बुजून सूडबुद्धीने ही कारवाई केलेली आहे आणि याच कारवाईच्या विरोधात कर्जत जामखेडच्या मतदारसंघातील जनतेने युवा ने त्यांचे खंबीरपणे पाठीमागे उभा राहण्यासाठी 24 तारखेला मोठ्या संख्येने मुंबई येथे हजर राहावे ही नम्र विनंती धन्यवाद रमेश आजबे जामखेड