जामखेड न्युज——
साकत ग्रामस्थांच्या वतीने महादेवाच्या नंदीचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर महाराज देवस्थान आहे. या देवस्थानच्या नावाने नंदी ( कठाळ्या ) सोडलेला असतो. संपूर्ण गाव मोठ्या भक्ती भावाने त्याची पूजा करतात. आज त्याचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने केक आणला होता तसेच नंदीला सजवले होते. तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांला समोर घेत केक कापून फटाक्यांची आतषबाजी केले तोफा वाजवल्या मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.
यावेळी सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, नानासाहेब लहाने, डॉ. शंकर वराट, भास्कर मुरूमकर, महावीर लहाने, प्रदिप लहाने, पांडुरंग अडसूळ, अशोक मुरूमकर, सुशांत लहाने, भास्कर वराट, महेश वराट, प्रथमेश वराट, रुपेश लहाने, आजीनाथ पुलवळे, द्वारकादास वराट, सोमा वराट, शाहुराव जावळे, त्रिंबक पवार, सुखदेव नेमाने, गोरख वराट, बाबुराव पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री साकेश्वर महाराज देवस्थान साठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने दिड वर्षापूर्वी सहा महिन्याचे काजळी खिल्लार जातीचा नंदी सांगोला (पंढरपूर) येथून आणला होता. यावेळीही मोठी मिरवणूक काढली होती.
महाशिवरात्र व चैत्र महिन्यातील पौर्णिमा नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी यात्रा असते त्यावेळी देवाची पालखी संपूर्ण गावात मिरवली जाते पालखीपुढे नंदीचीही असतो यावेळी कामधंद्या व नोकरी निमित्त बाहेर असलेले लोक यात्रेसाठी गावी येतात. पालखी मिरवणूकीत सहभागी होतात.