जामखेड न्युज——
आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय माघार नाही – बाळासाहेब दोडतले
धनगर आरक्षणप्रश्नी यशवंत सेनेचे पुन्हा उपोषण सुरु
सरकारला पन्नास दिवसांत दिलेला वेळ संपला सरकारने कसलीही कारवाई केली नाही यामुळे धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सरकार आरक्षणाचा जीआर काढत नाही व धनगर समाजाचा अनुसुचित जमातीच्या यादीत समावेश करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असे उपोषणकर्ते यशवंत सेनेचे प्रमुख बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.
यासंदर्भात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगीतले,की धनगर समाजाच्या अनूसुचित जमाती आरक्षणाची अमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सप्टेबरमध्ये एकवीस दिवसाचे आमरण उपोषण झाले.त्यावेळी राज्यशासनाने यशवंत सेनेला 50 दिवसात आरक्षण अमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते.
मात्र प्रत्यक्षात संपलेल्या पन्नास दिवसात आरक्षण अमलबजावणी संदर्भात राज्यशासनाने काहीच निर्णय घेतला नाही.उपोषाणकर्त्याबरोबर बैठक घ्यायची,चर्चा करायची,परंतु कृती काहीच करायची नाही,असा लबाडीचा खेळ राज्यसरकारकडून सुरु असल्याचा आरोप दोडतले यांनी केला.
त्यामुळे यशवंत सेनेने पुन्हा एकदा आमरण ऊपोषणाचा मार्ग निवडला आहे.यावेळी स्वतः बाळासाहेब दोडतले,मागील उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर आमरण उपोषणास बसले असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील म्हणाले,50 दिवसात आरक्षण अमलबजावणी करण्यासाठी शासन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून केंद्र सरकारला शिफारश करुव दोन महीन्यात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन आरक्षणाची अमलबजावणी करण्याचे तसेच चार राज्यांचा आरक्षण अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमण्याची व राज्यातच शासननिर्णय काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.मात्र यातील काहीही झाले नाही.एकूणच राज्यसरकार धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे.
यावेळी बाळासाहेब दोडतले, सुरेश बंडगर
प्रा. आण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, किरण धालपे,दत्ता काळे,स्वप्निल मेमाणे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.