साकतचे शेतकरी ट्रान्सफॉर्मरवर आमदार प्रा. राम शिंदे यांनी अधिकारी घेतले फैलावर

0
671

जामखेड न्युज——

साकतचे शेतकरी ट्रान्सफॉर्मरवर

आमदार प्रा. राम शिंदे यांनी अधिकारी घेतले फैलावर

 

गेल्या पाच महिन्यांपासून साकत येथील बोरीचा मळा येथील शेतीसाठी असलेला ट्रान्सफॉर्मर पाच महिन्यांपासून जळाल्यामुळे कृषी पंप बंद आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. कोटेशन धारकांनी बीले भरूनही पाच महिन्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचे खुपच हाल होत आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज ट्रान्सफॉर्मरवर चढून आंदोलन केले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले व ताबडतोब ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश दिला.


पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला व साकतच्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली वीजबील भरूनही पाच महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मर मिळत नाही असे सांगितले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत आज सायंकाळ पर्यंत ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश दिला यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्या परिसरात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. तरीही शेतकऱ्यांनी आपापली बीले भरली पण जळालेला ट्रान्सफॉर्मर मिळालाच नाही वारंवार पाठपुरावा करूनही कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले शेवटी आज संतप्त शेतकरी ट्रान्सफॉर्मर वर चढून बसले ही बातमी महावितरण ला समजताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

आज सकाळी ट्रान्सफॉर्मरवर चढून आंदोलन आंदोलन केले यावेळी पंधरा शेतकरी होते यामध्ये द्वारकादास वराट, सुमनताई वराट, अकुंश वराट, बाळासाहेब वराट, शंकर वराट, राम वराट, राम वराट, बाजीराव वराट यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, माजी सरपंच सदाशिव वराट, बाळासाहेब वराट यांनी भेट दिली.

पाच महिने झाले ट्रान्सफरमर जळला होता. अधिकाऱ्यांनी संगीतले बिले भरा, तर सर्व शेतकऱ्यांनी विजबिले एक महिना झाले भरले, तरी ट्रान्सफरमर देत नाहीत. पाऊस नसल्यामुळे पैशाची अडचण असताना, सर्व ग्राहकांनी वीज बीले भरले.आत्ता अधिकारी ट्रान्सफरमर देण्यास टाळाटाळ करत आहेत यामुळे आंदोलन करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी कोल्हेवाडी येथील महिलांनी वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयाला टाळे लावले होते. तेव्हा पाच महिन्यांपासून बंद वीजपुरवठा सुरू केला होता. आजही शेतकरी आक्रमक झाले तेव्हा सायंकाळ पर्यंत ट्रान्सफॉर्मर बसुन देतो असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here