Tuesday, February 10, 2026
Home ताज्या बातम्या सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे यांची...

सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे यांची किर्तनसेवा संपन्न

0
379

जामखेड न्युज——

सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे यांची किर्तनसेवा संपन्न

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची मोठ्या उत्साहात सोमवार दिनांक ३० पासून सुरूवात झाली आज दुसऱ्या दिवशी ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे कर्जत यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले.

त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.

पुण्यवंत व्हावे। घेता सज्जनांची नावे।।

नेघे माझी वाचा तुटी। महालाभ फुकासाठी।।

विश्रांतीचा ठाव। पायी संतांचिया भाव।।

तुका म्हणे पापे। जाती संतोचिया जपे।।

-संत तुकाराम

जन्माला येऊन चांगले काम करणे म्हणजे ‘पुण्य.” रंजल्यागांजल्यांशी एकरूप होणे. त्यांची मनापासून सेवा करणे, हे पुण्यमय काम. पण संत तुकाराम म्हणतात, संतसज्जन हे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आहेत. संत म्हणजे कल्पतरू. ते आपल्या हाताला धरून आयुष्यातली प्रगतीची वाट दाखवितात आणि जीवननौका पैलतीराला अलगद पोचवितात. संत निरपेक्ष, निरामय स्नेह देतात. म्हणून संतांचे नाव घ्यावे आणि गाठीशी पुण्य बांधावे. संतांचे नुसते नाव घेतले तरी माणूस पुण्यवान होतो.

संतांची थोरवी वर्णन करण्यास वाणी अपुरी पडते. संतसंग हा सहज, पुकट मिळणारा मोठा लाभ आहे. संतांच्या पायी श्रद्धा ठेवणे, हा आयुष्यातील विश्रांतीचा डाव आहे. संतांच्या नावाचा जप केला, तर आयुष्यातली पापे नाहीशी होतात.

संत तुकाराम म्हणतात, संतांचा महिमा असा अपार आहे. संतांचे नाव घ्यावे, पुण्य तर लाभतेच पण सर्व चिंता हरण होतात. मन निर्मळ होत जाते. आपला देवाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. 

कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी हभप उत्तम महाराज वराट, हभप बागडे महाराज,
हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, अशोक सपकाळ महाराज, उतरेश्वर महाराज वराट, मनोज महाराज राजगुरू जामखेड भजनी मंडळ, तसेच पारगाव, ढाळेवाडी, अनपटवाडी, धामणगाव, देवदैठण भजनी मंडळ यांच्या सह फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते.

साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

रोज सायंकाळी सात ते नऊ महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार आहे.

 

आज मंगळवार दि. ३१ रोजी ह. भ. प. प्रकाश महाराज जंजिरे कर्जत यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले.

बुधवार दि. ०१ रोजी गोविंद महाराज शिंदे निमगाव (धा)

गुरूवार दि. ०२ रोजी ह. भ. प. दयानंद महाराज कोरेगांवकर

शुक्रवार दि. ०३ रोजी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक नेवासा

शनिवार दि. ०४ रोजी ह. भप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे

 

तसेच रविवार ०५ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन

रविवार दि. ०५ रोजी ह.भ.प. सुनील महाराज झांबरे आष्टी सायंकाळी ०७ ते ०९

तसेच सोमवारदि ०६ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.

या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे सहभागी आहेत

भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर असतात.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट यांच्या सह संपूर्ण गावकरी नियोजन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!