जामखेड न्युज——
साकत सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संकरित गाई खरेदीसाठी कर्ज वाटप
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्यपूर्ण उत्पन्न मिळेल म्हणून परिसरातील शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून संकरित गाई खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रती गाय 75 हजार रुपये याप्रमाणे पाच लाख पंचवीस हजार रुपयांच्या चेकचे वितरण करण्यात आले.
परिसरातील शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय वाढावा चार पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी साकत सेवा संस्थेच्या वतीने प्रकरणे तयार करून पाठविले होते. तेव्हा शेतकऱ्यांची गरज ओळखून जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी ताबडतोब कर्ज प्ररकरणे मंजूर केले. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचे चेक वितरित करता आले.
आज दि. ३१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी साकत सेवा संस्थेचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन शिंदे, सचिव दादा मेंढकर, साकत ग्रामपंचायतचे मा. सदस्य महादेव वराट आदी मान्यवर उपस्थित होते.
धनादेश वितरित करताना सुधीर (दादा) राळेभात म्हणाले की, कर्जदारांनी वेळच्या वेळी कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे. तसेच थकित कर्जदारांनी एकरकमी कर्जफेड योजनेचा फायदा घ्यावा व आपली कर्जफेड करावी असे आवाहन केले.