जामखेड न्युज——
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास आघाडी जोमात
जामखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत जवळा मध्ये निवडणूक प्रचाराने जोर धरला असुन शेतकरी ग्रामविकास आघाडी जोमात असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा सुरू झाली आहे. जवळा गावाच्या जडणघडणीत कै. श्रीरंग कोल्हे, किसनराव दळवी, प्रदीप आबा पाटील यांनी दिलेले मोठे योगदान ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वारसदार जवळा गावातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. विकासाचे स्वप्न घेऊन शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे. यामुळे प्रचारात शेतकरी ग्रामविकास आघाडी जोमात आहे.
सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार सर्वांभिमूख असलेले चेहरे असुन जवळा गावात आपल्या कामाने व समाजातील प्रत्येक घटकातील माणसांबरोबर सलोख्याचे संबंध असलेले सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड तर सदस्यपदासाठी पांडुरंग उध्दव शिंदे, प्रदिप किसनराव दळवी, सौ दिक्षा सूरज कांबळे, संतराम आदिनाथ सुळ, रूपाली राहूल लोंढे, रोहिणी दत्तात्रय वाळुंजकर, किसन दत्तात्रय सरोदे, प्रशांत भाऊसाहेब पवार, सिताबाई रामभाऊ पठाडे, दशरथ यदु हजारे, पूजा उमेश रोडे, सोनाली गौतम कोल्हे, नय्युम अस्लम शेख, ठकुबाई साधू हजारे, दैवशाला उमेश हजारे हे शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पँनलने दिलेले उमेदवार लोकाभिमुख असुन प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरणारे आहेत असे ग्रामस्थ चर्चेतून ऐकायला मिळत आहे.