चीनमध्ये घुमला बीडच्या अवाज, मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णकामगिरी भारताचा पदकाचा अर्धशतक पुर्ण

0
348

जामखेड न्युज——

चीनमध्ये घुमला बीडच्या अवाज, मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णकामगिरी

भारताचा पदकाचा अर्धशतक पुर्ण

 

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्रानं सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळे यांनं आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. अविनाश साबळेच्या या यशानं भारताला आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरता आलं आहे.


अविनाश साबळे यानं काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. यावेळी आशियाई स्पर्धेत तो सुवर्णपदक मिळवेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.


गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश हा ७ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळं त्या कामगिरीवर अविनाश साबळे देखील स्वत: खुश नव्हता. मात्र, अविनाश साबळे यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीन सहभाग घेतला आणि आज सुवर्णपदाकवर नाव कोरलं आहे.

अविनाश साबळे यानं आजच्या स्पर्धेपूर्वी यंदाच्या हगांमातील हांगझोऊ येथील आशिायाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा असल्याचं म्हटलं होतं. मी राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यासाठी धावत नसून हांगझोऊ मधील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मानस असल्याचं तो म्हणाला होता. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी धावणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलं असून चांगली कामगिरी करुन सुवर्णपदकावर नाव करोणार असं तो म्हणाला होता.

हिंदुस्थानी खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करीत पदकांचे अर्धशतक साजरे केले. रविवारी हिंदुस्थानी खेळाडूंनी 3 सुवर्ण, 7 रौप्य व 5 कास्य अशी एकूण 15 पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानने 13 सुवर्ण, 21 रौप्य व 19 कास्य अशी एकूण 53 पदके जिंकून पदक तक्त्यामध्ये चौथे स्थान पटकावले. यजमान चीन 131 सुवर्ण, 72 रौप्य व 39 कास्य अशी एकूण 242 पदकांची लयलूट करीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. कोरिया 125 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे,
तर जपान 112 पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

मी स्टीपलचेस शर्यतीत सोनेरी यश मिळविणार याबद्दल आत्मविश्वास होता. स्वप्न अखेर सत्यात उतरले. मी 5000 मीटर शर्यतीवरदेखील लक्ष पेंद्रित करत आहे.
– अविनाश साबळे

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here