सामाजिक संस्था व राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांतर्फे जामखेड शहरात स्वच्छता मोहीम

0
446

जामखेड न्युज——

सामाजिक संस्था व राष्ट्रीय महामार्ग कर्मचाऱ्यांतर्फे जामखेड शहरात स्वच्छता मोहीम

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा निमित्त स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या रविवारी १ ऑक्टोबर रोजी प्रा. लक्ष्मण ढेपे (अध्यक्ष आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठान) व जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरातील विंचरणा नदी परिसर, भगवान शंकर मुर्ती परिसर, बस स्थानक परिसर तसेच पंचायत समिती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हि सेवा – 2023 हा कार्यक्रम रविवार दि. 1-10-2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक अंतर्गत, रा. म. 548 D जामखेड ते सौताडा चे ठेकेदार धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि श्रीगणेश कन्स्ट्रकशन, पुणे याचे संयुक्त विद्यमाने जामखेड येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील, प्रा. लक्ष्मण ढेपे (अध्यक्ष आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठान), धनेश्वर कन्स्ट्रक्शन चे नरेद्र गांगोले (प्रोजेक्ट डायरेक्टर), सचिन पवार (प्रोजेक मॅनेजर), सुरेश मगदुम, प्रा. शिलाजित मंडल (अॅथोरिटी इंजिनियर ईकाम व्हेंचर), प्रवीण उगले सह सर्व इंजिनियर, सुपरवायझर तसेच कामगार आदी उपस्थित होते.


यावेळी बरोबर एक जेसीबी, ट्रॅक्टर तसेच प्रत्येकाने हातात झाडू घेत विंचरणा नदी परिसर, भगवान शंकर मुर्ती परिसर, बस स्थानक परिसर व पंचायत समिती आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील गाजर गवत, अनावश्यक गवत काढत परिसर चकाचक केला.


महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आज रविवारी 1 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता देशभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य स्वच्छता मोहिमेत सर्वांनी किमान एक तास श्रमदान करून, आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या जवळची नदी, मंदिर परिसर, शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये परिसर स्वच्छता करणे हिच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल असं प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here