जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी
व भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांची सारोळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. नऊ जागांसाठी नऊच अर्ज आल्याने साडेपाच वाजता तहसिल कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला.
बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी पालकमंत्री प्रा राम शिंदे, मराठा गौरव युवराज काशिद, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवान मुरुमकर, स्वाती काशिद, हिंदुराज काशिद, मकरंद काशिद, अंगद सांगळे, देविदास पवार, मनिष चोरड यांनी विशेष परिश्रम घेतले यामुळे सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
मागील पाच वर्षांत सरपंच अजय काशीद यांनी गावात पाणलोट, शैक्षणिक याबरोबर सर्वच कामे अत्यंत दर्जेदार केली आहेत. गावात तंटामुक्त, व्यसनमुक्ती अभियान चांगल्या पद्धतीने राबविले यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अजय काशिद यांच्यावर गावकऱ्यांनी भरोसा ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे.
आदर्श गाव सारोळा ग्रामपंचायतींसाठी पुढील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. रितु अजय काशिद, आनिता राजेद्र मासाळ, चैताली शंकर जगदाळे, संगीता दादाहारी बहीर, किरण रघुनाथ मुळे, हर्षद बंडु मुळे, शहाजी सोण्याबापू पवार, संतोष मुरलीधर खवळे, मनिषा बाबुराव तांबे या नऊ सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने माजी सरपंच व भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद व नवनिर्वाचित सदस्याचे अभिनंदन माजी मंत्री प्रा. राम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल लोखंडे, सोमनाथ पाचरणे, गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, अभिजित राळेभात, महारुद्र महारनवर, लहू शिंदे, अमित चिंतामणी, तुषार पवार, मकरंद काशिद, अरुण महारनवर, सुभाष जायभाय, सागर सदाफुले, पोपट राळेभात, मनोज राजगुरु, केशव वनवे, वैजीनाथ पाटील, विलास मोरे, बापुराव ढवळे, रवी सुरवसे, बिभिषन धनवडे, शरद कार्ले,मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे, उद्धव हुलगुंडे, मंगेश आजबे, शिददेश्वर पवार, हिंदुराज मुळे, बजरंग नाना मुळे, सुरेश बहीर, विकास मासाळ, संभाजी जगदाळे,राजेंद्र बहीर,बाबासाहेब जगदाळे,सतिश मुळे,रामदास आण्णा मुळे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.