तालुकास्तरीय खो – खो क्रीडा स्पर्धेत श्री विंचरणा विद्यालयाचे घवघवीत यश, जिल्ह्यासाठी निवड

0
191

जामखेड न्युज——

तालुकास्तरीय खो – खो क्रीडा स्पर्धेत श्री विंचरणा विद्यालयाचे घवघवीत यश, जिल्ह्यासाठी निवड

 

जामखेड तालुका शालेय क्रीडा समिती व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि १२ व १३ सप्टेंबर रोजी शालेय पावसाळी क्रीडा खो खो श्री विंचरणा विद्यालय पिंपरखेड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या त्या मध्ये श्री विंचरणा विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी विजेतेपद पटकावले. विद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जामखेड महाविद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक जि.प माजी सदस्य मधुकर आबा राळेभात, वैजिनाथ पोले, श्री प्रकाश सदाफुले, संस्था अध्यक्ष श्री दिगांबर ढवळे,अरुण गाडेकर सर, हानिपभाई सय्यद व तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी श्री मधुकर आबा राळेभात यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले . सौ सुनंदाताई पवार यांनी विद्यालयास स्वच्छतागृह बांधण्यासाठी दिड लाख रुपयांची मदत दिल्या बद्दल मुलांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला . ताईंनी खेळाडूंना खेळाचे महत्व पटवून दिले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये श्री विंचारण विद्यालयच्या १७ वर्षे वयोगटातील मुले व मुली यांनी विजेतेपद पटकावले व तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला या सर्व खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापक शंकर खताळ, मुजावर सर, ससाणे सर काळाणे, शिपाई पिंटू मामा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्था अध्यक्ष दिगांबर ढवळे, सचिव भाऊसाहेब ढवळे यांचे पाठबळ मिळाले . या सर्व खेळाडूंना सोसायटीचे संचालक श्री मोहन शिंदे यांनी खो खो किट सप्रेम भेट दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here