जामखेड न्युज——
जालना जिल्ह्य़ातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ जामखेड शहरासह तालुक्यातील विविध गावात शांततेत कडकडीत बंद
सकल मराठा समाजाच्या वतीने काल जामखेड तालुक्यात बंद ची हाक देण्यात आली होती या हाकेला जामखेड शहरातील व्यापारी व ग्रामस्थांनी पाठींबा देत आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता जामखेड शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. त्यामुळे शहरात शुकशुकाट दिसून येत होता. आनेक पक्ष व संघटनांनी या बंदला पाठींबा दिला होता.
सकल मराठा समाजाच्या वतीने काल दि २ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी गावातील लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा निषेध केला होता. यावेळी त्या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि ३ रोजी जामखेड तालुका बंद ची घोषणा केली होती. याच अनुषंगाने आज जामखेड शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला.
अंतरवाली सराटी येथील लोकांवर लाठीचार्ज झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज्यात संतापाची लाट उसळली आहे ,जामखेड शहरात देखील याचे पडसाद उमटले आहेत .जामखेड सकल मराठा समाज्याच्या कडुन बंद पुकारून घटनेतील दोषींवर कारवाई करावी ,आंदोलन गुन्हे मागे घेण्यात यावेत ,आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा आशा विविध मागण्या सध्या सकल मराठा समाज्याकडुन होत आहेत.
जामखेड शहराबरोबरच तालुक्यातील खर्डा, देवदैठण, जवळा, नान्नज, साकत, आरणगाव ,पाटोदा गरडाचे ,पाडळी फाटा सह तालुक्यातील आनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी सकाळ पासूनच स्वयंपुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. यामुळे शहरात शुकशुकाट दिसून येत होता. या बंदला कॉंग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,संभाजी ब्रिगेड जामखेड तालुका ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुका, वंचित बहुजन आघाडी जामखेड व समस्त भीम सैनिक जामखेड यांच्या सह विविध संघटनांनी देखील या घटनेचा निषेध करुन जामखेड बंदला पाठींबा दिला होता.
कोठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता . व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने आपली दुकाने बंद ठेवल्याने व बंदला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिल्याने जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी व ग्रामस्थांचे आभार मानले.