जामखेड न्युज——
प्रा. दादासाहेब मोहिते यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा करत जपली सामाजिक बांधिलकी,
मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप
प्रा. दादासाहेब मोहिते यांचा मुलगा वेदांत याच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत निवारा बालगृहात साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. बाल वयात समाजातील वंचित, गरीब मुलांबद्दल सामाजिक जाणिव निर्माण व्हावी म्हणून प्रा. मोहिते यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस निवारा बालगृहात साजरा केला.
यावेळी निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अरुण जाधव, प्रा.बहिर सर, प्रा.भोंडवे सर, प्रा.कसाब सर, प्रा. डिसले सर, प्रा.बिबिषन डिसले सर, ग्रां.प.सदस्य.विकास सांगळे, महारुद्र नेमाने, अनुष्का मेडिकलचे संचालक तात्यासाहेब जरे, माजी सैनिक अशोक नेमाने, मा.कृष्णा डूचे, प्रतिक मुरूमकर, रोहित मोहिते तसेच सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
परिसरातील कोल्हाटी, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड मजूर, वीटभट्टीमजूर, भटक्या- विमुक्तांच्या पाल्यांसाठी मोहा (ता.जामखेड) येथे निवारा बालगृहात सुमारे शंभरच्या आसपास मुले आहेत या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची सोय मोफत केली जाते. अनेक लोक आपला वाढदिवस तेथील चिमुकल्या सोबत साजरा करतात दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हे पवित्र काम अँड डॉ. अरूण जाधव करत आहेत. हे काम प्रत्यक्ष पाहून अनेकांना मदत करावी अशी भावना होते. अनेक गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांचे पालकत्व अँड डॉ. अरूण जाधव यांनी स्विकारले आहे. याच ठिकाणी प्रा दादासाहेब मोहिते यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.