आमदार रोहित पवारांच्या सृजन कार्यालयावर अज्ञाताचा हल्ला, कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

0
208

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या सृजन कार्यालयावर अज्ञाताचा हल्ला, कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाररोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञात आरोपीं विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे.त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली. कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही

रोहित पवार राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात आले आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला का? अशी चर्चा सुरु आहे. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here