अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर रहा – पोलीस निरीक्षक महेश पाटील

0
225

जामखेड न्युज——

अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर रहा – पोलीस निरीक्षक महेश पाटील

 

आमली पदार्थांची नशा केल्यामुळे आपल्यासह आपल्या परिवाराचेही जीवन उद्ध्वस्त होते. यामुळे आमली पदार्थांच्या व्यसनापासून दुर राहण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. याबरोबरच सामाजिक व महिला सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालनही नागरिकांनी करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

आज दि. २६ जून रोजी रोजी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड शहरातील ल.ना. होशिंग विद्यालय येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी खालील प्रमाणे मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत.

१) नशा मुक्ती, अंमली पदार्थाचा वापर टाळणे.
२) सोशल मीडियावरील अनावश्यक बाबी प्रसारित न करणे.
३) अफवावर विश्वास ठेवू नये.
४) मुलींना काही अडीअडचणी असल्यास समक्ष अथवा अर्जद्वारे कळवावे.
५) डायल 112 चा वापर करावा
अश्या विविध सूचना देत पोलीस कामकाजाविषयी माहिती सांगून अंमली पदार्थाची विरोधात जनजागृती व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य
श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, अनिल देडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमा वेळी विद्यालयातील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक हजर होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here