जामखेड न्युज——
राहुल उद्योग समूहातर्फे निवारा बालगृहातील मुलांना बिर्याणीचे जेवन
राहुल उद्योग समूहाचे दादासाहेब (हवा) सरनोबत व बापुसाहेब कार्ले यांच्या संकल्पनेतून एक दिवस वंचितासोबत म्हणून निवारा बालगृहातील मुलांना बिर्याणीचे जेवन देण्यात आले.
यावेळी निवारा बालगृहाचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. अरूण जाधव, मनसे तालुकाप्रमुख प्रदिप टापरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले
सनी सदाफुले, पोपट कार्ले, बबलु आजबे, समर्थ सरनोबत, शंकर कार्ले, बालु साठे, भीमटोलाचे प्रमुख बापु गायकवाड, संतोष चव्हाण यांच्या सह पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील कोल्हाटी, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड मजूर, वीटभट्टीमजूर, भटक्या- विमुक्तांच्या पाल्यांसाठी मोहा (ता.जामखेड) येथे निवारा बालगृहात सुमारे शंभर च्या आसपास मुले आहेत या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची सोय मोफत केली जाते. अनेक लोक आपला वाढदिवस तेथील चिमुकल्या सोबत साजरा करतात दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हे पवित्र काम अँड डॉ. अरूण जाधव करत आहेत. हे काम प्रत्यक्ष पाहून अनेकांना मदत करावी अशी भावना होते. यातून कसलेही औचित्य नसताना मुलांना बिर्याणीचे जेवन देण्यात आले.
निवारा बालगृहात सध्या शंभरच्या आसपास मुले आहेत या मुलांना राहुल उद्योग समूहाचे दादासाहेब (हवा) सरनोबत व बापुसाहेब कार्ले यांच्या संकल्पनेतून एक दिवस वंचितासोबत म्हणून निवारा बालगृहातील मुलांना बिर्याणीचे जेवन देण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.