टिफिन बैठकीतून विचारांची देवाणघेवाण – आमदार प्रा राम शिंदे टिफिन बैठकीतून आमदार प्रा. राम शिंदे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

0
191

जामखेड न्युज——

टिफिन बैठकीतून विचारांची देवाणघेवाण – आमदार प्रा राम शिंदे

टिफिन बैठकीतून आमदार प्रा. राम शिंदे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

टिफिन बैठकीतून विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांशी संवाद साधता येतो. पोळी भाजीची देवाणघेवाण होते. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असे आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्ष यशस्वी पुर्ण केली या निमित्ताने महाजनसंपर्क अभियानांतर्गत आज आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहरात भव्य दिव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून मोटारसायकल रॅली आयोजित करत नागेश्वर मंदिरात समारोप करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने आपापले टिफिन सोडत जेवनाचा आनंद लुटला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पोपटनाना राळेभात, मनोज कुलकर्णी, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सलीम बागवान, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, संचालक सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, अँड, प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, गोरख घनवट, उद्धव हुलगंडे, ऋषिकेश मोरे यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी निघालेल्या मोटारसायकल रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. नंतर नागेश्वर मंदिरात टिफिनचा आनंद लुटला यावेळी बुक्कीने कांदा फोडून खाण्याचा आनंद औरच असतो असे आमदार शिंदे यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. तसेच वारंवार अशा बैठकीचे आयोजन करावे अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here