जामखेड न्युज——
निवारा बालगृहातील अनाथ निराधार मुलामुलींच्या स्वागतासाठी दोन वह्या एक पेन मदतीने आवाहन
आपल्या मदतीने वंचिताचे शैक्षणिक भविष्य घडणार
जामखेड येथील अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, दलित, भटके- विमुक्त,आदिवासी, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोर-गरिब, कष्टकऱ्यांच्या मुलां-मुलीच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहात शेकडो मुलांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी दोन वह्या, एक पेन, एक दप्तर, एक कंपास पेटी, एक टिफिन डब्बा,एक पाणी बाॅटल इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करावे असे आवाहन निवारा बालगृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी)ता-जामखेड जि अहमदनगर याठिकाणी अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार , दलित,भटके-विमुक्त, आदिवासी, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोर-गरिब, कष्टकऱ्यांच्या मुलां-मुलीच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहात 100 मुलां- मुलींना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला असून या मुलांचे स्वागत करण्यासाठी 2 वह्या व 1 पेन,1दप्तर,1कंपास पेटी,1टिफिन डब्बा,1पाणी बाॅटल इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करावे.
बालगृहातील मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य वह्या, पेन, कंपास, दप्तर, टिफिन, चप्पल, पाटी, पेन्सिल इत्यादी वस्तूची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्तींनी लवकरात लवकर मदत करावी हि नम्र विनंती.
संपर्क :-
वैजिनाथ केसकर सर – 9588602662
संतोष चव्हाण सर- 7798453611