जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी शशिकांत सुतार हजर

0
218

जामखेड न्युज——

जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी शशिकांत सुतार हजर!!! 

कार्यक्षम अधिकारी म्हणून परिचित असलेले
शशिकांत सुतार जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी हजर झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मित्र परिवार विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे.

 

पदभार स्विकारताच मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव; यानिमित्ताने ‘ रयत ‘ च्या नागेश विद्यालयाच्या १९८५ तील गुणवंत आणि विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या यशवतांच्या आठवणींना मिळाला उजाळा. या विभागाचा उपअभियंता म्हणून पदभार स्विकारणारे शशिकांत हे जामखेड तालुक्यातील ‘ दुसरे अधिकारी ‘ ठरले आहेत.

शशिकांत सुतार हे १९८५ सालच्या नागेश विद्यालयाचे विद्यार्थी ; दुसऱ्या क्रमांकाचे मार्कस घेऊन स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण बीड येथून त्यांनी पूर्ण केले. १९८९ ते १९९६ या काळात शशिकांत यांनी पुणे येथील नामांकित बांधाकाम व्यावसायिका सोबत काम केले ; पुढे १९९६ ला सार्वजनिक बांधकाम विभाग , नगर येथे ते रुजू झाले. शाखा अभियंता म्हणून जामखेड, राहूरी, श्रीगोंदा, नगर आणि जामखेड येथे सेवा केली ; २०२२ ला शशिकांत यांना ‘बढती ‘ मिळाली आणि वसई – पालघर येथे ते उप अभियंता म्हणून ते रुजू झाले. यानिमित्ताने जिल्ह्या बाहेर ते पहिल्यांदाच गेले ; मात्र तेथे फार काळ रमले नाहीत.

दरम्यान जामखेड येथील तात्कालीन उपअभियंता संजय कांबळे यांची प्रधानमंत्री ग्राम सडक विभाग, अहमदनगर येथे प्रशासकीय बदली झाली आणि त्यांच्या जागी शशिकांत सुतार यांनी १ जून २०२३ ला ‘ उपअभियंता’ म्हणून पदभार स्विकारला ; सुतार यांच्या येण्याने तालुक्यातील हा पदभार सांभाळणारे ते दुसरे अधिकारी ठरलें आहेत. यापूर्वी मोहरी (ता.जामखेड) येथील रहिवासी ; सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.के. इंगळे यांनी
उपअभियंता म्हणून तालुक्यात प्रभावी काम केले होते ; तसेच काम शशिकांत सुतार यांच्याकडून होईल ; अशी जामखेडकरांची माफक अपेक्षा आहे.

शशिकांत हे सेवानिवृत्त सहशिक्षक स्वर्गीय डी.एन. सुतार यांचे चिरंजीव आहेत ; सुतार सरांनी सेवा काळात कोणतेच ‘प्रमोशन’ स्विकारले नाही; जामखेडच्या मुलांना इंग्रजी ‘धडे’ त्यांनी खूप वर्षे रयतच्या नागेश विद्यालयातून दिले ; कडक शिस्तीचे आणि तेवढेच लोकप्रिय ही त्यांची खासियत होती ; जामखेड तालुक्यात निरनिराळ्या क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी चमकले आहेत.

शशिकांत यांच्या सौभाग्यवती संगिता या देखील इंग्रजी विषयाच्या उच्य पदवीधर ; त्यांनाही ‘रयत’ मध्ये सेवेची संधी मिळत होती मात्र कुटुंबातील जबाबदारीमुळे त्यांनी ती स्विकारली नाही. सासरे डी.एन सुतार आणि सासू सुमनताई यांची त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत खूप सेवा केली . हे सर्व पहात असताना मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी तसूभरही दूर्लक्ष होऊ दिले नाही. थोरली मुलगी मधुरा २०२० ला तर धाकटी निशिगंधा ने २०२२ ला ‘काॅम्प्युटर इंजीनियरिंग’ पूर्ण केले ; दोघीही पुणे येथील नामांकित ‘आयटी कंपनी’ त नोकरी करीत आहेत.

चौकट –

रयत च्या नागेश चे १९८५ च्या बॅचचे हे आहेत यशवंत ठरलेले विद्यार्थी…!

——————————————-
सुरेश कोळी – तहसीलदार -नंदुरबार.

शशिकांत सुतार -उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग ; जामखेड.

शरद जरे- सह निबंधक; सहकारी संस्था औरंगाबाद.

अजय कुलकर्णी – उपविभागीय कृषी अधिकारी,पूणे.

असिफ पठाण, पोलिस निरीक्षक,नगर.

डॉ.सुरेश काशीद – वैद्यकीय क्षेत्र जामखेड

डॉ.अनिल गायकवाड – वैद्यकीय क्षेत्र जामखेड

ॲड.पोपठ कात्रजकर – वकील जामखेड

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here