जामखेड न्युज——
जामखेड न्युजचा अंदाज तंतोतंत खरा!!
जामखेड बाजार समिती सभापतीपदी शरद कार्ले तर उपसभापतीपदी कैलास वराट

आठ मे रोजी जामखेड न्युजने प्रसिद्ध केलेल्या बातमीत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदासाठी भाजपतर्फे शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे तर आमदार रोहित पवार यांच्या पँनल कडून सभापती पदासाठी सुधीर राळेभात तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांचे नावे प्रबळ दावेदार म्हणून बातमी प्रसिद्ध केली होती. तो अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे.

यानुसार आज आमदार प्रा राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पँनल तर्फे सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांनी फार्म भरले होते तर आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास पँनल तर्फे सभापती पदासाठी सुधीर राळेभात तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांनी फाँर्म भरले होते. दोन्ही बाजूंना समसमान मते होते त्यामुळे चिठ्ठी द्वारे सभापती व उपसभापती निवडी पार पडल्या यात सभापती पदाची चिठ्ठी शरद कार्ले यांची तर उपसभापती पदाची चिठ्ठी कैलास वराट यांची निघाली यामुळे जामखेड न्युजचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 जागा मिळाल्या होत्या. चिठ्ठीद्वारे आमदार प्रा. राम शिंदे गटाचे शरद कार्ले तर उपसभापती पदी आमदार रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झाली आहे.

तब्बल अडीच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली यात
कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या होत्या आमदार प्रा. राम शिंदे गटातर्फे सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे यांनी अर्ज भरले होते तर आमदार रोहित पवार गटाकडून सभापती पदासाठी सुधीर राळेभात तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांनी फाँर्म भरले होते. दोन्ही बाजूंना समसमान मते झाल्याने शेवटी चिठ्ठी द्वारे निवड करण्यात आली राजश्री रामभाऊ जाट या मुलीच्या हाताने चिठ्ठी उचलण्याची प्रक्रिया झाली यात सभापती पदासाठी शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली.
कोणत्याही गटाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. धोका नको व कोणी फुटू नये म्हणून दोन्ही गटानी आपापले सदस्य सहलीसाठी घेऊन गेलेले होते. चिठ्ठी द्वारेच सभापती व उपसभापती निवड झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात
सभापती व उपसभापती निवड कार्यक्रम पुढील प्रमाणे होता
नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती दुपारी 1 ते 1.30
नामनिर्देशन पत्र छाननी 1.30 ते 1.45
वैध नामनिर्देशन यादी प्रसिद्ध करणे 2.00
नामनिर्देशन माघार 2.00 ते 2.15
अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी 2.20
आवश्यक वाटल्यास मतदान प्रक्रिया 2.25 ते 3.00
मतमोजणी 3.00 ते 3.15
निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करणे 3.30
चिठ्ठी द्वारे सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्या
निवडणूकीसाठी निवडणूक प्राधिकृत अधिकारी म्हणून विशेष जिल्हा लेखा परीक्षक आर. एस. निकम यांनी काम पाहिले. तर त्यांना सहकार्य म्हणून निलेश मुंडे, प्रकाश सैंदाने तसेच बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद यांनी काम पाहिले. यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




