जामखेड न्युज——
छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला, शौर्याला, विद्वत्तेला, कर्तृत्वाला, बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही – तहसीलदार योगेश चंद्रे
जामखेड मध्ये शंभुराजे कुस्ती संकुलच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
एका हातात शस्त्र तर दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडवणारे, असामान्य कर्तृत्ववान छत्रपती संभाजी महाराज यांनी युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्याचे काम केले महाराजांच्या त्यागाला, शौर्याला, विद्वत्तेला, कर्तृत्वाला, बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा या महान योद्ध्यांचा आदर्श आपण घेऊन स्वाभिमानी जीवन जगावे असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
जामखेड शहरात शंभुराजे कुस्ती संकुलच्या वतीने मंगेश (दादा) आजबे यांनी खर्डा चौकात संभाजी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, शंभु राजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे, माजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, विकास तात्या राळेभात, बजिरंग मुळे, दादाराजे भोसले, कृष्णाराजे चव्हाण, दत्ता साळुंखे, अस्लम मिस्तरी, मंगेश मुळे, सचिन साळुंके, श्रिधर जीवडे, नितीन वारे, पै. बापु जरे, डॉ कैलास हजारे, गणेश हगवणे, अमोल लोहकरे, शिवकुमार डोंगरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंभुराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते, एकही लढाई ते हरले नाहीत तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेऊन त्यानुसार अनुकरण करावे असे सांगितले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, संभाजी महाराज यांनी देशासाठी व धर्मासाठी जे योगदान दिले आहे तसेच काही प्रमाणात आपणही आपल्या देशासाठी योगदान द्यावे असे सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर मोठ्या प्रमाणात युवकांची गर्दी होती.