घरकुल-अमृत महाआवास अभियानामुळे जिल्ह्यात साडेसोळा हजार तर तालुक्यात दोन हजार लोकांना मिळाला निवारा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा राज्यात प्रथम तर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नियोजनामुळे जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम

0
187

 

जामखेड न्युज——
घरकुल-अमृत महाआवास अभियानामुळे जिल्ह्यात साडेसोळा हजार तर तालुक्यात दोन हजार लोकांना मिळाला निवारा

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा राज्यात प्रथम तर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नियोजनामुळे जामखेड तालुका जिल्ह्यात प्रथम

अमृत महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आत्तापर्यंत 16500 घरे पूर्ण करून राज्यात सर्वोच्च राहण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जामखेड प्रथम क्रमांकावर असून जामखेड तालुक्यात 2011 घरे पूर्ण आहेत. 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे अभियान 31 मार्च रोजी संपत आहे. या कालावधीत जामखेड तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक 1610 तर राज्यपुरस्कृत योजनेचे 401 अशी एकूण 2011 घरे पूर्ण केली आहेत. याबद्दल पंचायत समिती प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभियान कालावधीत सर्वाधिक।घरे पूर्ण करण्यात पंचायत समितीचे सर्व संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, RHE, CDEO, रोजगार।सेवक, केंद्र चालक, ग्रामपंचायत कर्मचारी* यांचे मोठे योगदान आहे.

अभियान अद्याप सुरू।असून 31 मार्च ला संपणार आहे. तोपर्यंत उर्वरित सर्व घरे पूर्ण करून राज्यात प्रथम येण्याचा मान आपल्याला मिळवायचा चंग पंचायत समितीने बांधला आहे.

या यशात जामखेड तालुक्यातील पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. कधी झाली नव्हती एवढी जाणीव जागृती पत्रकार बंधूनी केली. काही गावात वर्तमानपत्रातील बातम्यांचे फ्लेक्स लागले. हे महाराष्ट्रात फक्त जामखेडमध्ये घडले असेल .मा. तहसीलदार साहेबांनी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाले.

जामखेड तालुक्यातील सन्माननीय जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य, सक्रिय कार्यकर्ते/सामाजिक कार्यकर्ते यांनीही घरकुल भेटी देताना अधिकारी/कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली.

चौकट-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, मा. प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, तसेच DRDA चे साळवे साहेब आणि टीम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. CEO साहेबांनी प्रत्येक तालुक्याला जाऊन 2-3 बैठका घेतल्या, DRDA ने तांत्रिक अडचणी।सोडविण्यासाठी दिवस रात्र प्रतिसाद दिला, यामुळे काम करण्यास चालना मिळाली. मा.खा. सुजयदादा विखे-पाटील, मा.आ.रोहितदादा पवार आणि मा.आ.प्रा. राम शिंदे साहेब यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल खासदार महोदय आणि दोन्ही आमदार महोदयांचेही प्रशासनाने आभार मानले आहेत.

-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here