६८ वर्षे अखंड विनावादन हाच खरा साकतचा सुगंध – ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने साकतच्या सप्ताहाची सांगता

0
143

जामखेड न्युज——

६८ वर्षे अखंड विनावादन हाच खरा साकतचा सुगंध – ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले

प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने साकतच्या सप्ताहाची सांगता

गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज (आबा) यांनी गावातील विठ्ठल मंदिरात सुरू केलेला वीणावादक व नंदादीप आजही सुरू आहे हाच खरा साकतचा सुगंध आहे असे मत आखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. रामचंद्र बोधले महाराज यांनी काल्याच्या किर्तनात व्यक्त केले.

किर्तनासाठी त्यांनी

पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥

करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥

आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥

एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥

हा अभंग घेतला होता.

अर्थ :- गोवळी पाहत होते आणि कृष्णदेव त्यांचे उष्टे खात होते ।।1।।

कान्होबाचे सवंगडी त्याच्या नामाचे चिंतन करीत होते ।।ध्रु।।

आपल्यावर आलेला डाव खेलावा आणि गाईंचे रक्षण करावे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हरी व तुम्ही सर्वजन एका ठिकाणी काला करा ।।3।।

यावेळी त्यांनी सांगितले की, मानवतेची खरी सुरुवात गोकुळात सुरू झाली. समाज सुसंस्कृत होण्यासाठी शाळा व मंदिराचीही आवश्यकता आहे. निष्ठेने व पावित्र्य मनात ठेवून काम केल्यास फळ चांगले मिळतेच आबांनी सुरू केलेला विणा व नंदादीप अद्याप सुरूच आहे. हिच खरी पावित्र्याची ताकद आहे. यामुळे गावची चांगली ओळख निर्माण झाली आहे असे बोधले महाराज म्हणाले.


किर्तनासाठी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, डॉ. सुहास सुर्यवंशी, रमेश वराट (दाजी) प्रमोद मुरूमकर, चेअरमन हनुमंत वराट, डॉ. अजय वराट, ईश्वर मुरूमकर, हभप परमेश्वर महाराज बोधले, डॉ. महारुद्र सानप, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, हभप दत्ता महाराज येवले, दादा मेंढकर, हभप माऊली महाराज कोल्हे, हभप भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, अतुल दळवी, आश्रू सरोदे, रामभाऊ मुरूमकर, आश्रू मुरूमकर, यांच्या सह सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, माऊली महाराज कोल्हे, हभप माऊली महाराज गाडे, हभप दादा महाराज सातपुते, हभप काका महाराज निगुडे, हभप पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, हभप गहिनीनाथ सकुंडे, हभप अशोक महाराज सपकाळ, विठ्ठल भजनी मंडळ, श्री साकेश्वर भजनी मंडळ, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या फडावरील भजनी मंडळासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील साकतची ओळख प्रतिपंढरपूर म्हणून आहे. येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त, आखील भारतीय वारकरी मंडळ प्रेरित आज गुरूवार दि. १६ एप्रिल पासून भव्य- दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात सुरूवात झाली होती.

सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे झाले

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप माऊली महाराज कोल्हे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते ४ हरिजागर असा दिनक्रम असे झाले

पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा झाली

गुरूवार दि १६ एप्रिल रोजी कर्जत येथील विनोदाचार्य हभप आक्रुर महाराज साखरे

शुक्रवार दि. १७ रोजी डिकसळ येथील हभप आण्णासाहेब महाराज बोधले,

शनिवार दि. १८ रोजी कर्जत येथील हभप प्रकाश महाराज जंजिरे

रविवार दि. १९ रोजी भूम येथील हभप अतिश महाराज कदम

सोमवार दि. २० रोजी पंढरपूर येथील ज्ञानसिंधू हभप जयवंत महाराज बोधले

रात्री मंगळवार दि. २१ रोजी बीड येथील हभप महादेव महाराज राऊत

बुधवारी दि. २२ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक अशा मान्यवर किर्तनकाराचे किर्तन झाले तर गुरूवारी २३ रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य ह. भ. प. यमकाचार्य प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here