जामखेड न्युज——
गाव गुंड व खंडणी बहादरांचा बंदोबस्त करा – अँड. डॉ. अरुण जाधव
गेले तीन वर्षे शांत असणारे जामखेड पुन्हा दहशतीच्या सावटाखाली येत आहे. मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली आहे. शहरात लहान मोठ्या गुंडांचे मोठ मोठे बॅनर्स झळकत आहेत. अनेक गावगुंड राजरोसपणे खंडणी मागतात अनेकांकडे विना परवाना हत्यारे आहेत याचा धाक दाखवतात व दहशत पसरवितात यामुळे शांत जामखेड पुन्हा दहशतीच्या सावटाखाली येत आहे याचा निषेध करण्यासाठी कलाकेंद्र चालक, कलाकार व शहरातील सुज्ञ नागरिकांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन केले होते. यात बोलताना गाव गुंड व खंडणी बहादरांचा बंदोबस्त करा असे आवाहन प्रशासनाला अँड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.
दि.२१ मार्च २०२३ रोजी रात्री जामखेड शहरातील कला केंद्रावर २० मुलांच्या टोळीने शस्त्र घेवून महिलांना मारहाण व छेडछाड करुन धमकी दिली तसेच खंडणी द्या नाही तर कलाकेंद्र चालु देणार नाही असे म्हणून जबरी मारहाण केली, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून दहशत निर्माण करून ३ कलाकेंद्रावरची मोडतोड केली. जवळपास ३०० कलाकार मंडळी दहशतीच्या छायेखाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज रोजी सकाळी १०.३० वाजता जामखेड बस स्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक, कोर्ट गल्ली, तहासिल कार्यालय येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.
” गाव गुंड व खंडणी बहादरांचा बंदोबस्त करा,सोसणारं नाय अत्याचार,आम्ही लढायला आहोत तयार. अशा घोषणांनी जामखेड शहर दुमदुमले.
या मोर्चा प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते, तसेच राष्ट्रवादी चे नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तुपेरे, मनसे चे प्रदिप टापरे, उपाध्यक्ष सनि सदाफुले,काँग्रेसचे राहुल उगले पाटील, लोक अधिकार चे प्रवक्ते बापुसाहेब ओहोळ , अझहरभाई काझी,सागर अंदूरे,भरत राळेभात,विक्रम डाडर,वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, संभाजी ब्रिगेड चे कुंडल राळेभात,आदिवासी नेते विशाल पवार, वंचित चे योगेश सदाफुले ,प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर,गणेशशेठ डोंगरे, हभप गाडे (महाराज),अजिनाथ शिंदे आदी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी आले होते.
यावेळी अँड. डॉ. अरुण जाधव ,माजी सरपंच नरेंद्र जाधव, नगरसेवक गुलचंद अंधारे,अमित जाधव, अरुण डोळस, मच्छिंद्र जाधव, धनराज राजगुरु,चंद्रकांत जाधव, रमेश राळेभात, अल्का जाधव , छाया नवले, गीता जाधव, उमा जाधव, रवि अंधारे, विशाल जाधव, समीर चंदन , सनी जाधव ,कृष्णा जाधव, मोहन जाधव,बाबासाहेब काळे,अरविंद जाधव,संतोष पवार,शुभम जाधव, उमेश जाधव आदी कोल्हाटी समाज व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.