पत्रकारांचा दबाव गट निर्माण होणे आवश्यक – एस.एम.देशमुख पत्रकार मेळाव्यासाठी कर्जत येथे नियोजन समितीची बैठक संपन्न

0
169

जामखेड न्युज——

पत्रकारांचा दबाव गट निर्माण होणे आवश्यक – एस.एम.देशमुख

पत्रकार मेळाव्यासाठी कर्जत येथे नियोजन समितीची बैठक संपन्न

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी मेळावे होतात यात अडीअडचणीवर सकारात्मक चर्चा होऊन सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जातो यामुळे मेळावे आवश्यक आहेत. यातून दबावगट निर्माण होतो. महाराष्ट्र पत्रकार परिषद हि मातृसंस्था आहे. देशात सर्वात जास्त सदस्य संख्या परिषदेची आहे. परिषदेच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना या वर्षी ६५ लाखांची मदत करण्यात आली आहे. यामुळे मेळावे आवश्यक आहेत. असे आखील भारतीय मराठी परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले.

कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा सात एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कर्जत जामखेड पत्रकारांची बैठक संपन्न झाली. यावेळी आखील भारतीय पत्रकार संघाचे विश्वस्त एस. एम. देशमुख, सरचिटणीस मन्सूरभाई सय्यद, विजयसिंह होलम, शोभाताई देशमुख,डिजिटल मिडियाचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे, जितेंद्र शिरसाठ, दिनकर शिंदे, कर्जत तालुकाध्यक्ष गणेश जेवरे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, मच्छिंद्र अनारसे, आशिष बोरा, योगेश गागंर्डे, अशोक वीर, अविनाश बोधले, किरण रेडे, पप्पूभाई सय्यद, भाऊसाहेब तोरडमल, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, सुभाष माळवे यांच्या सह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, पत्रकारांचा दबाव गट निर्माण झाला पाहिजे तरच राज्यकर्ते सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करतात मेळाव्याचे हे नववे वर्ष आहे. ३५४ तालुक्यात शाखा आहेत. कर्जत जामखेडची ओळख महाराष्ट्रात झाली पाहिजे कर्जत मधील अष्टविनायक सिद्धटेक, राशिन देवी, शेगुड खंडोबा, दुर्योधन मंदिर, रेहेकुरी अभयारण्य आहे. जामखेड तालुक्यातील चोंडी, खर्डा ऐतिहासिक किल्ला जवळच बीड जिल्ह्यातील रामेश्वर धबधबा हि ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हे ठिकाणे राज्यातील पत्रकारांना पाहता येतील यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे.

 

 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा नगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत असल्याची घोषणा एस.एम देशमुख यांनी केली आहे.

 

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्यकारीनी तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.. पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात.. यावर्षी हा सोहळा नगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे.

७ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल.. आमदार रोहित पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असतील. या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान ६०० प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.. तसे नियोजन कर्जत आणि जामखेड येथील संयोजन समिती संयुक्तरित्या , करीत आहे.

मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी केलं आहे.

कर्जत हे नगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.. विदर्भ मराठवाड्यातून येणाऱ्या पत्रकारांना जामखेड मार्गे कर्जतला जाता येईल. कोकण, मुंबई पुण्याकडून येणारया पत्रकारांना सोलापूर रोडने भिगवण मार्गे कर्जतला जाता येईल.. कर्जतला थेट रेल्वे नाही.. नगर किंवा पुणे स्टेशनवरून बसने कर्जतला जाता येते.. कर्जतचे रूट आणि अन्य माहिती लवकरच दिली जाईल.

यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा
अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती
लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली
नाशिक विभाग: अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद
कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here