जामखेड न्युज——
—आणि पुढारी वडाला फुटली पालवी
राष्ट्रीय महामार्गच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असणारे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली शहरातील जनतेच्या भावना निर्माण झालेले वडाचे झाड म्हणजे पुढारी वड याचाही नंबर आला आणी तोही तोडला गेला तेव्हा अनेकांनी वडाबद्दल आपापल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी दुख व्यक्त केले तर राजकीय पक्षांनी पुजा केली तेव्हा महामार्गालगत तोडल्या गेलेल्या झाडांची पुर्नलागवड करणे गरजेचे अशा आशयाची बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत आमदार रोहित पवारांनी झाडांची पुर्नलागवड करण्याचे काम हाती घेतले होते. आणि विंचरणा नदीकाठी महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर वडाची लागवड केली होती. पुनर्लागवड केलेल्या वडाला कोंब ( पालवी फुटली आहे. यामुळे जामखेड करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महामार्गालगत असलेल्या पुढारी वडाला करवत लागली वरच्या फांद्या तोडल्या तेव्हा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आमदार रोहित पवारांनी वडाची पुर्नलागवड करण्यासाठी संबंधित यंत्रणा यांना संपर्क केला बांधकाम विभागाशी संपर्क केला तेव्हा पुणे येथील कंपनीचे औताडे यांनी झाडावर रासायनिक प्रक्रिया केली लेप लावला आमदार रोहित पवार यांनी सर्व यंत्रणा कार्यान्वित करत जेसीबी मशिनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा सपाटीकरण केला खोल सात फुट खड्डा घेतला आणि सकाळी क्रेनच्या साहाय्याने टिपर मध्ये टाकून विंचरणा नदीकाठी पुर्नलागवड केली होती. आज या वडाला कोंब पालवी फुटली आहे.
राजकीय कुरघोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पुढारी वडाची पुर्नलागवड करणार आहे हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजले त्यांनी शुक्रवारी सायंकाळी जेसीबी मशिनच्या सहाय्याने वडाचे खोड उकरून काढले पण ते उचलण्यासाठी क्रेन व टीपर उपलब्ध झाले नाही तेव्हा सकाळी लागवड करण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी क्रेन टिपर व जेसीबी मशिनच्या सहाय्याने महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर झाडांची पुर्नलागवड केली.
झाडे लावून विकासाची स्पर्धा करावी
आम्ही एक झाड लावले तर भाजपाने दहा झाडे लावून शहरात विकासाची स्पर्धा करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. आमदार रोहित पवारांनी शंभर कोटी विकास निधी आणला तर आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिडशे कोटी विकास निधी आणावा विकासाची स्पर्धा करावी कोणी कोणाचे कामे अडविण्याची स्पर्धा करू नये असे सामान्य जनतेला वाटत आहे.
रोहित दादा पवार यांच्या संपर्क कार्यालयाने गेल्या एक महिन्यापासून वडाची काळजी घेतली. होती यामुळे या वडाला पालवी फुटली आहे.
पुर्नलागवड केलेल्या वडाला पालवी फुटल्याने जामखेड करांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.