जामखेड न्युज——
जामखेडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा महिला समिती करणार भव्य दिव्य शिवजयंती साजरी
डॉ. देवानंद माळी यांची शाहिरी तर धनंजय (भाई) यांचे व्याख्यान

जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद असणार आहेत तर जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने हे नववे वर्ष आहे तर महिला आयोजित शिवजयंतीचे हे तिसरे वर्ष आहे. गुरूवार दि. ९ रोजी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आठ वाजता झी मराठी, स्टार प्रवाह, झी टॉकीज, सह्याद्री वाहिनी, कलर्स मराठी, एबीपी माझामाझा इत्यादीवर सादरीकरण तसेच झी मराठी पाऊल पडती पुढे चे विजेते आंतरराष्ट्रीय क्रिर्तीचे शाहिर सम्राट देवानंद माळी यांचा कार्यक्रम होईल.
शुक्रवार दि. १० रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पासून ऐतिहासिक भव्य पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच पाच वाजता शिवप्रतिमा पुजन व सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता हिंदूराष्ट्र सेनेने संस्थापक अध्यक्ष मा. धनंजय (भाई) देसाई यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. ठिकाण लक्ष्मी चौक संविधान
स्तंभ जामखेड हे असेल. तरी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सौ. रोहिणी संजय (काका) काशिद यांनी केले आहे.

रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त तालुका महिला आघाडी व रोहिणी संजय काशिद आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती पासून महिलांची भगवे फेटे परिधान करून डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य रॅली निघणार आहे या रॅलीत मुलींचे शस्त्रपथक, मुलींचा रोप मल्लखांब, शिवथिम नृत्य व पोवाडे सादरीकरण केले जाणार आहेत. संविधान चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून महाप्रसाद कार्यक्रम होईल अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी संजय काशिद यांनी दिली.
जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोकांचे जीव वाचू शकतात जगात सर्व प्रकारच्या कारखाने आहेत आणि सर्व प्रकारच्या वस्तू त्या कारखान्यात बनवल्या जातात पण ब्लड अशी वस्तू आहे की ज्याचा कारखाना नाही. ती एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला दिले जाते म्हणूनच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान जगाने मान्य केलेआहे आणि शिवजयंती निमित्त जर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जर अभिवादन करायचे असेल तर आपण समाजाचे देणे लागतो म्हणून सर्व शिवभक्तांना शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून दुसऱ्याचे जीवन वाचवावे असे आवाहन केले आहे.
अशा प्रकारे जामखेड तालुका महिला आघाडी वतीने अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा तर शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आंतरराष्ट्रीय क्रिर्तीचे शाहिर डॉ. देवानंद माळी यांची शाहिरी तर हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय (भाई) यांचे व्याख्यान आयोजित करून आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन आयोजक सौ. रोहिणी संजय (काका) काशिद यांनी केले आहे.





