जामखेड न्युज——
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर येथे बदली तर जामखेडला महेश पाटील
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची पारनेर पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे तर त्यांच्या जागी महेश पाटील हे पोलीस निरीक्षक म्हणून जामखेड पोलीस स्टेशनला आले आहेत.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची जिल्ह्य़ातील सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षक यांच्या बदल्याचे आदेश काढले असून जामखेड पोलिस स्टेशनला महेश पाटील यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची पारनेर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. याचबरोबर खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज शाखेत बदली झाली आहे. तर खर्डा पोलीस ठाण्यात महेश जानकर यांची सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कार्यकाळात अनेक उपाययोजना करत त्यांनी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे मोठे काम केले आहे. अनेक गुन्ह्यातील अंतरराज्य स्तरावरील व विविध जिल्ह्य़ातील गुन्हेगार अटक करून संबंधित पोलीस स्टेशनला सपुर्द करण्याचे काम केले होते. तर खाजगी सावकारी, महिला व मुलिंना संरक्षण, वाहतूक नियंत्रण अशा अनेक पातळ्यांवर मोठे काम केले आहे. तसेच सामाजिक सलोखा या विषयावरही त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते.