जामखेड न्युज——
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या पाचही बक्षीसावर नाशिकच्या धावपट्टूंचे वर्चस्व
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
जामखेड येथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य खुली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष गटातील पाचही विजते स्पर्धक तसेच ११ किलोमीटर गटातील प्रथम विजेती स्पर्धकही. नाशिक येथीलच असल्याने या स्पर्धेवर नाशिकचेच वर्चस्व राहिले असल्याचे दिसून आले.
आज दि. २२ जानेवारी रोजी जामखेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुली हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन बारामती अँग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, पैलवान बाळासाहेब आवारे, परंडा येथील सभापती पै.नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे युवक नेतृत्व सुर्यकांत मोरे, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष बबन (काका) काशिद, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी जि.प. सदस्य प्रविण घुले, सारोळा गावच्या सरपंच रितु अजय काशिद, संजय वराट, डॉ. सुरेश काशिद, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, रावसाहेब जाधव (मेजर), नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, रमेश आजबे, राम निकम, विजय कोठारी, प्रविण उगले, NNC चे मयुर भोसले, रमेश बोलभट, प्रल्हाद साळुंके, आदी क्रिडा प्रेमी, पत्रकार, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजक पै. बबन काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातून ५०० च्या वर तसेच स्थानिक स्पर्धकही मोठ्या संख्येने व उत्साहात सहभागी झाले होते. सर्व स्पर्धा निष्पक्षपातीपणे व निर्विघ्नपणे संपन्न झाली.
स्पर्धेच्या सुरूवातीस भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सुचना व मार्गदर्शन प्रा. मधुकर यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मयुर भोसले व पत्रकार निलेश दिवटे यांनी केले
यावेळी पार पडलेल्या स्पर्धेतील विजेते
२१ किलोमीटर पुरुष गट :
प्रथम चंदन यादव नाशिक, २१००० रूपये,
द्वितीय-अंकित कुमार नाशिक, १५००० रूपये
तृतीय- देवेंद्र चौधरी नाशिक, ११००० रुपये
चतुर्थ-रोहित बिन्नर नाशिक, ७००० रूपये
पाचवा- अनिल यादव नाशिक, ५००० रूपयेविजेते ११ किलोमीटर महिला गट
प्रथम शैली धामा -नाशिक-११००० रूपये
द्वितीय -अश्विनी काटोले- ७००० रूपये
तृतीय- निकिता मात्रे ५००० रूपये
चतुर्थ – सुरेखा मातणे ३००० रूपये
पाचवा- विशाखा बास्कर -अ नगर २००० रूपयेविजेते ५ किलोमीटर कुमार गट मुले
प्रथम – विजय ढोबळे- परभणी ५००० रु –
द्वितीय – वैभव शिंदे- जालना ३००० रु
तृतीय- विराज भोसले- अ नगर २००० रूपयेविजेते ५ किलोमीटर कुमार गट मुली
प्रथम -वेदिक मंडलिक- नाशिक ५००० रु
द्वितीय- जान्हवी रोझोदे- जळगाव ३००० रु
तृतीय- अश्विनी हिरडे – श्रीगोंदा-२००० रुविजेते ५ किलोमीटर वरिष्ठ गट
प्रथम – डॉ सानप – जामखेड ५००० रु
द्वितीय – बद्रीप्रसाद वाबळे- नाशिक ३००० रु
तृतीय- विजय भोसुरे- पुणे २००० रूपयेसर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद यांनी दोन किलोमीटर पोहणे स्पर्धेमध्ये यश मिळवल्याबद्दल जामखेडकरांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाली..