जामखेड न्युज—–
तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा शिऊर येथील भैरवनाथ विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड तालुक्यातील शिऊर येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दि. ११ रोजी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जामखेड येथिल ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालयाच्या १७ वर्षे व १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक तर १९ वयोगटात नंदादेवी हायस्कूल नान्नज यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलींमध्ये १४ वर्षे वयोगटात नंदादेवी हायस्कूल, १७ वर्षे वयोगटात भैरवनाथ माध्यमिक विद्यालय शिऊर तर १९ वर्षे वयोगटात ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
या स्पर्धेचे उद्घाटन जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, उपसरपंच विठ्ठल देवकाते, संस्थेचे संस्था प्रमुख रमेश वाघ, सचिव बाळासाहेब वाघ आदिंसह मान्यवर ग्रामस्थ, सहभागी संस्थांचे प्रतिनिधी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थिती होते. यास्पर्धाबाबत मुख्याध्यापक संतोष रत्नपारखी, नवनाथ आरोळे, पोपट पोकळे,उत्तम निकम, किरण देवकाते यांनी योग्य नियोजन केले होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून दिनेश शिंदे, साळुंके, जाधव, पाटील, उदावंत, मोहिते,राजकुमार थोरवे, पोकळे यांनी काम पाहिले.
एकंदरच सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.