जामखेड न्युज——
तरुणास मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
दुकानासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून फिर्यादीस मारहाण करत गळ्यातील सात तोळ्याची सोन्याची चैन काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील चार सदस्यांसह इतर अनोळखी तीन अशा सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला भरत पांडुरंग जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि २३ आँक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे शितल भांड्याच्या दुकानासमोर गाडी लावून रोडच्या पलीकडे असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी उमाकांत अंदुरे, सागर उमाकांत अंदुरे, शशिकांत अंदुरे, आदित्य शशिकांत अंदुरे व इतर अनोळखी तीन जण सर्व रा. जामखेड हे माझ्या कडे आले व मला म्हणाले की, तुला मागील वेळी सांगितले होते आमच्या दुकानासमोर गाडी लावू नकोस असे म्हणत उमाकांत अंदुरे यांनी हातातील लोखंडी गजाने मारहाण करुन माझ्या गळ्यातील सात तोळ्याची चैन काढून घेतली. व इतर आरोपींनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. यावेळी माझे मित्र सागर डिसले व अमोल आजबे हे आमचे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी फिर्यादी भरत पांडुरंग जगदाळे रा. जगदाळे वस्ती जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादी वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकाँन्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.