तरुणाईला “सेक्स टॉईज” च वेड? दहा लाख रुपये किमतीचे “सेक्स टॉईज” जप्त

0
215

 जामखेड न्युज——

तरुणाईला “सेक्स टॉईज” च वेड? दहा लाख रुपये किमतीचे “सेक्स टॉईज” जप्त

पुण्यातील तरुणाईला “सेक्स टॉईज” चं वेड लागलंय की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे. कारण पुण्यात दहा लाख रुपये किमतीचे “सेक्स टॉईज” ( sex toys) जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल शहरातील एका गोडाऊनमधून जप्त केला आहे.

याप्रकरणी एका व्यक्तीवर कलम 292,293 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू होती अशी प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणी तपास सुरू असून सेक्स टॉईज सापडलेल्या गोडाऊनमध्ये असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच काही अल्पवयीन मुलांना हे सेक्स टॉय विकल्या जात होत्या का याचा तपास पोलिस करत आहेत. संकेतस्थळावरून सेक्सटॉईजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पुण्यातील पुलगेट चौकीच्या बाजुला असलेल्या भाजी बाजारच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गोडाऊनमध्ये अनेक सेक्स टॉय होते.

याची किंमत जवळपास दहा लाख रूपयांच्या आसपास होती. पोलिसांनी गोदामातील एका व्यक्तीला ताब्यात घेत हा सर्व मुद्धेमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here