जामखेड न्युज——
शिक्षक बँकेवर तांबे गटाचे निर्विवाद वर्चस्व
जामखेड मधुन संतोष राऊत बँकेचे संचालक तर मुकुंद सातपुते विकास मंडळाच्या विश्वस्तपदी बहुमताने निवड
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक पदी संतोषकुमार राऊत तर अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या विश्वस्तपदी मुकुंदराज सातपूते
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या व शिक्षक विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. १६) सुमारे ९८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत चौरंगी लढत झाली. होती यात पहिल्या फेरीपासूनच गुरुमाऊली तांबे गट आघाडीवर होते. ती आघाडी शेवटपर्यंत टिकून ठेवली आणी जामखेड तालुक्यातून बँकेच्या संचालक पदी संतोषकुमार राऊत तर विकास मंडळाच्या विश्वस्तपदी मुकुंदराज सातपूते मोठे मताधिक्या घेत निवडून आले.
काल सोमवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेपासून नगर कल्याण रोडवरील सुखकर्ता लॉनमध्ये बँकेची तर पाईपलाईन रोडवर मोरया मंगल कार्यालयात विकास मंडळाची मतमोजणी सुरू झाली. दुपारी
उशिरा २१ जागांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘ गुरुमाऊली शिक्षक मंडळ २०१५’ ने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहेत.
तर पाथर्डी येथील एक जागा गुरूकुल मंडळाला मिळाली तर विकास मंडळाच्या १८ पैकी १८ जागा तांबे गटाने जिंकल्या
गुरुमाऊली तांबे गटाचे जामखेड
येथील उमेदवार संतोषकुमार राऊत हे ३४३४
मताधिक्य घेत विजयी झाले आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते हे
३३४४ मताधिक्य घेत विजयी झाले यामुळे जामखेड तालुक्यात गुरुमाऊली तांबे गटाने आनंदोत्सव साजरा केला.