जामखेड न्युज——
शिक्षकनेते रावसाहेब रोहोकले गुरुजींनी प्राथमिक शिक्षकांची पत आणि प्रतिष्ठा वाढवली – राम निकम
आपणा सर्वांचे शिक्षकनेते रावसाहेब रोहोकले गुरूजींनी ते चेअरमन असताना आपल्या बँकेच्या दरवर्षी होणाऱ्या सर्वसाधारण सभा शांततेत पार पाडल्या,दोन सत्रात सभा घेण्याची व उपस्थित सर्व सभासदांना एकत्र भोजन देण्याची नवीन पद्धत सुरु केली, विरोधी मंडळाच्या प्रमुखांना लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला ,विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली यामुळे सभा शांततेत व पाच तासापेक्षा जास्त वेळ चालल्या ,यातून गोंधळ घालण्याची परंपरा मोडीत निघाली ,त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणारे शिक्षक ही समाजाच्या मनातील भावना नष्ट झाली व त्यामुळे शिक्षकांची सामाजिक पत व प्रतिष्टा वाढली असे मत शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम यांनी मांडले, ते जामखेड तालुक्यात बँकेचे उमेदवार नारायण लहाने विकास मंडळ उमेदवार वैजिनाथ गीते यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते.
रोहोकले गुरुजींनी साडेतीन वर्षात आदर्शवत कारभार करून भक्कम पायाभरणी केली.शिक्षक बांधवाबरोबरच बाहेरच्या ठेवी मिळवल्या, ठेविंचा व्याजदर इतर बँकेच्या तुलनेत कमी केला त्यामुळे कर्जव्याजदर कमी झाला. डिव्हीडंड चांगला मिळायला लागला.कायमठेवीला चांगले व्याज मिळायला लागले. रोहोकले गुरुजीसारखे कणखर नेतृत्व असल्यामुळे समाजातील ठेवीदारांनी ठेवी ठेवायला सुरुवात केली त्यामुळे बँक भक्कम झाली .सभासदहिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.नवनवीन सभासद हिताच्या योजना राबवल्या,त्यामुळे सभासद हा रोहोकले गुरुजीसोबतच राहील असे ठाम मत व्यक्त केले ,यावेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र मोहोळकर यांनी विकासमंडळाविषयी माहिती देताना सांगितले विकासमंडळ संस्थेला देखील गुरुजींनी आर्थिक शिस्त लावली.संस्थेचे जुने गाळेभाडे करार नुतनीकरण केले.विकासमंडळ संस्थेचे उत्पन्न करमुक्त केले.त्यामुळे सरकारला TDS भरण्याची आवश्यकता नाही.विकासमंडळासाठी 80 G प्रमाणपत्र मिळवले.विकासमंडळ संस्था नफ्यामध्ये आणली.ज्या शिक्षकांनी विकासमंडळासाठी दहा हजार ₹ किंवा त्या प्रमाणात कायमठेव दिलेल्या आहेत त्यांना 8.50% दराने चांगला व्याजदर देऊन परतावा दिला.विकासमंडळ संस्था नफ्यामध्ये आणली.
विकासमंडळ नफ्यातून दुर्गम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यास सुरुवात केली.विकासमंडळ जागेवर कब्जा करून बसलेल्या बेकायदेशीर व्यक्ती, संस्थांना बाहेर काढले.विकासमंडळाची संपूर्ण जागा आणि गाळे आज रोजी संस्थेच्या ताब्यात आहेत.विकासमंडळ इमारत वास्तूबांधण्यासाठी रोहोकले गुरुजींनी खूप धडपड केली,परंतु काही विरोधी नेत्यांनी सतत आडकाठी आणून ही वास्तू पुर्ण होवू दिली नाही.रोहोकले गुरूजी सेवानिवृत्त झाल्यावर बँक एका गटाच्या ताब्यात बँक असल्यामुळे त्यांनी कायमठेवी वर्ग केल्या नाहीत.
त्यामुळे विकासमंडळ वास्तू बांधकाम पुर्ण होवू शकले नाही.परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, ही वास्तू निश्चितपणे उभी राहिल.शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ यांच्या माध्यमातून Covid -19 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत दिली.रायगड जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांना किराणा दिला.पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील गरजू धावपटू विद्यार्थीनींना आर्थिक मदत केली. या सर्व कामांमुळे प्राथमिक शिक्षकांबद्दल समाजात आदर निर्माण झाला.रोहोकले गुरुजींच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन अनेक शिक्षकांनी Covid -19 मध्ये आपापल्या गावासाठी मदती दिल्या.
अहमदनगर जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबाला समाजात पत आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात रोहोकले गुरूजी अग्रस्थानी आहेत,त्यामुळे यावेळीही जिल्ह्यात सुमारे 5000 मतदान घेऊन गुरुमाऊली मंडळ निवडून येईल असे राम निकम यांनी सांगितले, यावेळी त्यांचेसोबत आनंद राऊत, दत्तात्रय आंधळकर,संजय हजारे,गणपत चव्हाण, लक्ष्मीकांत देशमुख हे उपस्थित होते