जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत मधील अखंड हरिनाम सप्ताहात हभप दत्ता महाराज आंबिरटकर यांच्या किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध!!!
हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा ह. भ. प. दत्ता महाराज आंबीरटकर डिकसळ यांच्या किर्तनाने झाली
त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले.
पंढरीचें भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
बहु खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥ध्रु.॥
तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥२॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥३॥
पंढरीचे भूत फार मोठे आहे वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला ते तेव्हाच झपाटून टाकते. पंढरी क्षेत्रातील रान हे खूप खेचरीचे आहे तेथे जे कोणी येतात जातात त्यांचे मन वेडे होऊन जाते. त्यामुळे तेथे कोणी जाऊ नका आणि जे पंढरीला गेलेत ते संसारात पुन्हा कधीही परतून मागे आलेच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी देखील पंढरीला गेलो आणि पुन्हा जन्मालाच आलो नाही.”
कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे, हभप हरीभाऊ काळे, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, दिपक अडसूळ यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
आज शुक्रवार दि. १४ रोजी न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे वाघदरा बीड यांची कीर्तन सेवा होणार आहे.
शनिवार दि. १५ रोजी महेश महाराज माकणीकर लोहारा
रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.