जामखेड प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार जमा करावेत यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलन अर्धातास चालले त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जामखेड नगर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, जिल्हा संघटक अॅड.ऋषीकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, तालुका प्रसिद्धीप्रमुख कृष्णा डुचे, भीमराव पाटील, गणेश हागवणे, मंगेश मुळे, भाऊ डोके, बंडू बहिर, आबा जाधव, शंकर जाधव, चंदू कार्ले, गणेश परकाळे, वैभव कार्ले, मोहन मदने, बाबु साळुंखे, विशाल कोरडे, योगेश मुळे, बुवा दहीकर, बालाजी आजबे, प्रदीप कात्रजकर, सूरज मुळे, श्रीधर मुळे, शिवराज विटकर,परकाळे दाजी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे म्हणाले आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये म्हणून घोषणा केली व आठच दिवसात घोषणा मागे घेतली शेतकऱ्यांचे व घरगुती तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडा व लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी केली. दोन लाख रुपयांची कर्जमाफी करताना जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपये स्नानगृह अनुदान देण्याची घोषणा केली ते कधी देणार असा सवाल करून आजबे म्हणाले ते तात्काळ द्यावे. पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव यामुळे महागाई वाढली आहे यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय ठेवून दरवाढ कमी करावी व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे मागे घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करावी असे आजबे म्हणाले यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आम्ही सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या बरोबर असून सत्तेला लाथ व अन्यायाला साथ हे आमच्या संघटनेचे प्रथम कर्तव्य असल्याने आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी सुनिल लोंढे,
शहराध्यक्ष नय्युम शेख आदींनी मार्गदर्शन केले. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी रहदारी सुरळीत केली व चोख बंदोबस्त ठेवला.