जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज ( सुदाम वराट)
भरोसा पेटीच्या माध्यमातून विद्यार्थिनीना भरोसा देण्याचे काम जामखेड पोलिस स्टेशन करणार आहे तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण किंवा त्रास असेल तर निसंकोच पणे भरोसा पेटी मध्ये तक्रार टाकावी त्याचे निरसन जामखेड पोलिस स्टेशन करणार आहे तुम्ही एक हाक मारा आम्ही मदतीला तयार आहोत, विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड पोलिस स्टेशन भरोसा सेल अंतर्गत विद्यार्थिनी व महिला महिलांच्या सुरक्षतेसाठी भरोसा पेटीचे उद्घाटन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ सागर शिंदे ,स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्र कोठारी, विठ्ठल राऊत, प्रा मधुकर राळेभात, प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, प्राचार्य बी.के.मडके, मुख्याध्यापिका चौधरी के.डी., पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे, पोलीस नाईक संदीप आजबे, अनिता निकत, मनीषा घहिरे, शिक्षण विभाग समनव्यक प्रमोद ठेबरे, प्रा रमेश बोलभट, प्रकाश तांबे, एनसीसी अधिकारी मयूर भोसले, दिलीप ढवळे, दत्तात्रय ढाळे, उमर कुरेशी, महादेव साळुंके, मोहन यादव, प्रकाश खंडागळे, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, अजय अवसरे सह सर्व नागेश व कन्या विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर सागर शिंदे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुनर्वापर करता येतील असे सोळाशे कापडी मास्क वाटप केले.
जामखेड पोलिस स्टेशन च्या भरोसा सेल अंतर्गत भरोसा पेटीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांनी विद्यार्थिनी व महिला शिक्षिका कडे सुपूर्त केले त्याची व्यवस्था विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांमध्ये करण्यात येणार आहे.
कर्जत जामखेड साठी आमदार रोहित पवार व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या प्रयत्नातून भरोसा सेल साठी चार चाकी व दोन चाकी वाहने मिळालेले आहेत. त्यामुळे जामखेड पोलिस स्टेशन विद्यार्थिनी व महिला भरोसा देण्याचे काम करणार आहे.
विद्यार्थिनींवर कोणत्याही प्रकारचे दडपण येऊ नये व नावाची गोपनीयता ठेवण्यासाठी ही भरोसा पेटी विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांमध्ये बसवण्यात आलेले आहे याची जामखेड पोलिस स्टेशन महिला कर्मचारी यांच्याकडे चावी असेल व या तक्रारींची नोंद घेऊन त्या योग्य पद्धतीने निरसन केल्या जाणार आहेत. व विद्यार्थिनींना काही अडचण आल्यास माझ्या या 94 22644090 मोबाईल नंबरवर संपर्क साधावा आपणास सर्व मदत मिळेल असे मत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.
नागेश व कन्या विद्यालयाच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश बोलभट व आभार मयूर भोसले यांनी मानले.