जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयाची प्रथम वर्षातील विद्यार्थीनी कु. दिक्षा शाम पंडित हिने राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून जामखेड महाविद्यालयाचा गौरव वाढवलेला आहे.त्याबद्दल कु. दिक्षा आणि रौप्यपदक मिळवणारी कु. कोमल डोकडे या दोन्ही विद्यार्थीनींचा गौरव दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय संचालक मंडळाचे वतीने करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख बोलत होते. दिक्षा सारखी विद्यार्थीनी ग्रामीण भागातील तरुणांना आदर्शवत प्रेरणा बनणार आहे. तिच्या सारखंच यश मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच कठोर परिश्रमाची तयारी ठेवली तर संस्था आणि महाविद्यालय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाचे आपण सर्वांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नाव विद्यापीठ व राज्य पातळीवर घेऊन जावे ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. सुनिल नरके, राष्ट्रीय वुशू चँम्पियन प्रा. लक्ष्मण उदमले , शाम पंडीत, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल रेडे , डॉ. रंगनाथ सुपेकर , प्रा. सुनिल गोलेकर, प्रा. अविनाश फलके, प्रा. देशमुख, प्रा. राऊत, प्रा. पठाण यांच्या सह महाविद्यालयाततील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी यशवंत विद्यार्थीनीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राष्ट्रीय स्तरावरील चँम्पियनशीपचे सुवर्णपदक मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कार झाल्याने आत्मविश्वास आणि अभिमान खूपच वाढल्याची भावना सुवर्णकन्या दिक्षा हिने व्यक्त केली.
लवकरच केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय चँम्पियन स्पर्धेसाठी दिक्षा रवाना होणार आहे. तिथे सुद्धा तीने यश संपादन करावे अशा भावना सर्वच उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. मोहिते यांनी मानले तर सूत्रसंचलन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले.