जामखेड न्युज——
पाटोदा प्रतिनिधी
तरूण वयातच अनेकांना पाठदुखीचा त्रास सुरू झालेलाआपण पाहतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदलती आहारपद्धती. हाडांचं आरोग्य पीटिक आहारावर अवलंबून असतं त्यादृष्टीने हाडांचे आजार, लक्षणे व उपचार याबद्दल सजग राहणे आवश्यक आहे. भारतातील सहा कोटी लोकांना हाडांचा संधीवात आहे. चार कोटी लोक हाडांच्या ठिसूळपणाने ग्रस्त आहेत.
दर १० पैकी ८ जणांना कधी न कधी पाठदुखी कंबरदुखीचा चास एकदा तरी होतोच. हाडांचा संधीवात म्हणजे जगात सर्वात जास्त आढळणारा संधीवातात साध्याना झाकणान्या मऊ हाडांची झीज होते. संधिवाताची मुख्य कारणं वय, अनुवंशिकता आणि जीवनसत्वाची कमतरता हे आहे.बराचवेळ मांडी घालून बसण्याची सवय असणाऱ्यांना सुध्दा हा त्रास होतो.
स्टियोपोरोसिस हा एक सर्वव्यापी आजार आढळून येतो. ज्यामध्ये हाडांच्या ठिसूळपणात वाढ होऊन त्यात फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. वाढत्या वयात फॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. एका निरीक्षणानुसार भारतात जवळपास १० कोटी लोक ‘स्टियोपोरोसिस’ या आजाराशी झुंज देत आहेत. शरीरात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे ‘स्टियोपोरोसिसचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साधारण वयाची ४५ गाठल्यानंतर या आजाराची सुरुवात होते, मात्र ६०-७० वयापर्यंत हा आजार जास्त त्रासदायक होतो. हाडांचे हे आजार आणि संधीवात यावर हमखास उपचार करणारे डॉक्टर वैद्यकिय क्षेत्रामध्ये पुढे येऊ लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल. या रुग्णालयातील डॉ. अमोल जोगदंड आणि डॉ. बालाजी नवले यांनी एक अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी करुन दाखवली. बीड येथील श्रीमतीउर्मिला जाधव या ५० वर्षाच्या महिलेचा हात फ्रैक्चर झालेला असताना तसेच या रुग्णा महिलेला हृदयरोग, मधुमेह हे आजार असतानाही त्यांच्या हाताच्या कोपन्यावर अशक्य असणारी शस्त्रक्रिया करून दाखवली.
विशेष म्हणजे १ लाखाहून अधिक खर्च या शस्त्रक्रियेसाठी अपेक्षीत असताना डॉक्टरांनी महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत ही शस्त्रक्रिया विनामुल्य केली. चौड शहर आणि परिसरातील ज्या रुग्णांना हाडाचे आणि संधीवाताचे आजार आहेत त्यांच्यासाठी मातोश्री हॉस्पीटलमधील डॉ. जोगदंड आणि डॉ. नवले देवदूत ठरतील अशी त्यांची कामगिरी आहे. हाडांचे आजार ही आता एक सर्वसामान्य बाब झाली आहे. प्रत्येक दहा माणसामागे दोन व्यक्तींना तरी हाडाचे आजार असल्याचे दिसून येते. अपघाताचे वाढलेले प्रमाण यामुळे सुध्दा हाडांचे अनेक रुग्ण जिवंतपणी मरण यातना सहन करताना दिसतात. माणसाच्या शरीरामध्ये हाडाचे सर्वाधिक महत्व आहे. शरीरातील हाड मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.मात्र बदलत चाललेल्या आहार पध्दतीमुळे आवश्यक त्या प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही. अशा वेळी चांगल्या अस्थीरोग तज्ञाची आवश्यकता प्रत्येक रुग्णाला भासत आहे. बीड शहरातील आशा टॉकीजजवळ तुळजाई चौकामध्ये असलेल्या मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये नुकतीच एका महिलेच्या हाडाची अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. ज्यामुळे हे रुग्णालय येणाऱ्या काळात हाडांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी एक प्रकारे वरदान ठरणार असे दिसते. कारण श्रीमती उर्मिला जाधव (वय ५०) वर्ष) यांच्या हाताच्या कोपन्यावर फ्रैक्चर झाले होते. ज्यामुळे एक हात पुर्णपणे निकामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या महिलेच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक डॉक्टरांनी असमर्थता दर्शवली. शिवाय क्रियेसाठी लाख पेक्षा अधिक खर्च येणार होता. अशा वेळी मातोश्री हॉस्पीटल विषयी त्यांना माहिती मिळाली. यात दाखल झाल्यानंतर डॉ. अमोल जोगदंड, डॉ. मिनल जोगदंड पिंगळे यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचार सुरू केले.
■ मातोश्री हॉस्पीटल रुग्णांचे आश्रयदाते.
प्रसिद्धी पासून दूर असले तरी बीड शहरातील आशा टॉकीज जवळील तुळजाई चौकात असलेले मातोश्री हॉस्पीटल हजारो रुग्णांसाठी आश्रयदाते बनले आहे. २०१६ साली या रुग्णालयाची स्थापना झाली. या ठिकाणी आतापर्यंत १ हजारापेक्षा अधिक प्रसुती केल्या आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक शस्त्रक्रिया विनामुल्य
केल्या. अमोल जोगदंड यांनी एमडी मेडिसिन झाल्यानंतर रुग्णालयात दहा बेडचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. ट्रॉमाकेअर सेंटर, नवजात शिशु व बालरोग विभाग, डिजीटल एक्स-रे, टु-डी इको आदि अनेक सुविधा उपलब्ध आहेत, संधीवाततज्ञ डॉ.अमोल राऊत हे दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या ठिकाणी भेट देतात.
■ देवधूताप्रमाणे भेटले मातोश्री हॉस्पिटल!
प्राथमिक तपासणी केली.रुग्णालयातील नामवंत अस्थिरोगतज्ञ डॉ. बालाजी नवले यानी आपल्या सहकान्यांच्या मदतीने श्रीमती जाधव यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या महिलेला हृदयरोग, मधुमेह हे आजार असतानाही डॉक्टरांनी एक प्रकारचे धाडस दाखवून ही शस्त्रक्रिया केली. डॉ.संदिप पाटील यांनी भुलतज्ञ म्हणून तर डॉ. गणेश डोळे बांनी सहकारी म्हणून काम केले, उल्लेखनिय बाब म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी १ लाखापेक्षा अधिक खर्च लागणार होता. मात्र सणाची आर्थिक परिस्थिती गली नसल्यामुळे डॉ. अमोल जोगदंड यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत त्यांचा प्रस्ताव तयार करून ही शस्त्रक्रिया विनामुल्य करून दिली. देवदूत प्रमाणे भेटलेल्या मातोश्री हॉस्पीटलच जाधव कुटुंबाने आभार मानले.
■ अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वी केली
श्रीमती उर्मिला जाधव यांच्या हातावर अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. एव्हडेच नाही तर जनआरोग्य योजनेअंतर्गत १ लाख रुपये खर्चही वाचवला त्या महिलेला हृदयरोग मधुमेह हे आजार असताना देखील त्यांनी धाडस दाखवून ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडले आहे. त्यांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.