जामखेड न्युज——
नगर जामखेड रस्त्यावर वाघळुज घाटात तेलाचा टॅंकर पलटी झाल्याने नागरिकांनी तेल नेण्यासाठी गर्दी केली होती मिळेल त्या साधनात तेल घेऊन जात होते. पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेल नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत मिळेल तसे तेल लुटले.ही घटना नगर जामखेड रस्त्यावर वाघळूज घाटात घडली.

अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात नगरहून जामखेड च्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला.

रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने यातील ड्रायव्हर बेशुद्ध पडला ,टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून तेल गळत होते.सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ,ड्रम, हांडे घेऊन तेल मिळेल तसे तेल लुटण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती.उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.