जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड येथे पंचमी निमित्त भरलेल्या आनंदमेळाव्यात आनंद मेळा व यात्रा ठिकाणी चोरी करताना जामखेड पोलीसांना काही संशयित चोर आढळून आले असून त्यांचवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जामखेड येथे नागपंचमीच्या मुहुर्तावर मोठी यात्रा भरते. या वर्षीची यात्रा कोरोनाच्या काळानंतर तब्बल दोन वर्षांनी भरली असल्याने आनंद मेळा व यात्रेच्या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे.
जामखेड पोलीस व नगरपरिषदच्या माध्यमातून २५ CCTV कॅमेरे, पोलिस कर्मचारी व स्वयंसेवकांची माध्यमातून यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षा पुरविली जात आहे. यामुळे जत्रेत होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी सज्ज असलेल्या पोलिसांकडून यात्रेमध्ये चोरी करणारे काही इसम आढळून आल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर पुढील कारवाई सुरू केली आहे.

जामखेड पोलीस आपल्याला सुरक्षा पोहचविण्यासाठी कटीबध्द आहेत. तरीही यात्रेत येणाऱ्या नागरीकांनी आपले पैसे व मोबाईल व मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी व आपल्या बरोबर गैरप्रकार झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.