पुन्हा जनतेतून होणार सरपंच व नगराध्यक्ष!!

0
193
जामखेड न्युज——
2015 ते 2019 या कालावधीत भाजपा – शिवसेना युती  कार्यकालामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत निर्णय घेतला होता.  त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिकांमध्ये जनतेतून सरपंच , नगराध्यक्ष निवडीही झाल्या पण  महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून नगरपालिका, लोकनियुक्त सरपंच, नगराध्यक्ष पद्धती बदलून पुन्हा पूर्वीच्याच पध्दतीने नियुक्त सदस्यांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. 
   
 महाविकास आघाडीचा हा निर्णय बदलण्याचा निर्णय नवनियुक्त घेण्याच्या विचारात असल्याचे समजते.याबाबत माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी पुढाकार घेतलेला आहे. 
   १८ जुलै पासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडीचा निर्णय तातडीने बदलून सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here