जिल्ह्यात बसरवाडी शाळेचा स्वच्छ विद्यालयात प्रथम क्रमांक शाळांनी पुरस्कारापुरते न पाहता कामात सातत्य ठेवावे आशिष येरेकर

0
241
जामखेड न्युज——
    
 जामखेड तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा आता जिल्ह्यात सर्वात स्वच्छ शाळा म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक व सहकार्य करणारे ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्व शाळांनी पुरस्कारापुरते न राहता सातत्य ठेवावे.कधी कधी शिक्षक बदलले, मुख्याध्यापकाची बदली झाली की त्या शाळा मागे पडत जातात तसे होऊ देवू नका असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. 

   सततचे कष्ट आणि प्रबळ आत्मविश्वासाने यश मिळतेच भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव भारत सरकार शिक्षण विभाग स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 जिल्हा स्तरावर जि.प.प्राथ.शाळा बसरवाडी प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर, शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले  या सर्वांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हयातील 38 शाळांना जिल्हा स्तरावर सन्मानित करण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना आशिषजी येरेकर  म्हणाले की,”या पुरस्कारासाठी 38 शाळांचा आज सन्मान होत आहे.त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन.सहा सात हजार शाळांची नोंदणी, जिल्हास्तरावर 360 शाळा आणि योग्य गुणवत्ता मूल्यमापन करून 38 शाळांची निवड,यातून 16 शाळा राज्यस्तरावर मूल्यमापनासाठी सर्व शिक्षक,मुख्याध्याक त्यांच्या सर्व टिमचे मनापासून अभिनंदन.या सर्व शाळांनी पुरस्कारापुरते न राहता सातत्य ठेवावे.कधी कधी शिक्षक बदलले, मुख्याध्यापकाची बदली झाली की त्या शाळा मागे पडत जातात तसे होऊ देवू नका.” भास्करजी पाटील व कार्ले मॅडम यांनीही सर्व शाळेचे अभिनंदन केले.जिल्हा परिषद प्राथ.शाळा बसरवाडी हि तालुक्यातील पहिली iso शाळा,या शाळेमुळे तालुक्यात 100 शाळा iso झाल्या.त्याही समाजाचा सहभाग घेवून,हि जामखेड तालुक्यातील  शिक्षणक्रांती होती. सन 2016-17 मध्ये याच बसरवाडी शाळेला जिल्हयातील दुसरा क्रमांक गुणवत्ता शाळा पुरस्कार प्राप्त झाला.जिल्हास्तरावरून जामखेड तालुक्यात मूल्यमापन करण्यासाठी उज्वला गायकवाड मॅडम विस्तार अधिकारी कर्जत हया होत्या.योग्य प्रत्यक्ष आणि वास्तव मूल्यमापन त्यांनी केले.मॅडमचे कौतुक आणि मनापासूनचा आदर आहे. आज स्वच्छ विद्यालय पुरस्कारात जिल्हात प्रथम क्रमांक मिळाला त्याच बरोबर राज्य पुरस्कारासाठी पुढे प्रस्तावित करण्यात आले.हि बाब जामखेड तालुक्यासाठी अभिमानाची,ग़ौरवाची नक्कीच आहे.जि.प.प्राथ.शाळा बसरवाडी शाळेने स्वच्छ विद्यालय पुरस्कारात पाच विभागात क्रमांक प्राप्त करत जिल्हयात प्रथम क्रमांक प्राप्त केला.जिल्हाधिकारी आशिषजी येरेकर साहेब व शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब,विस्तार अधिकारी जयश्री कार्ले मॅडम यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.उपस्थित नायगावचे केंद्राचे केंद्रप्रमुख किसन वराट ,जिवलग मित्र दिपक चव्हाण, मु.अ.एकनाथ (दादा)चव्हाण आणि खूप खूप योगदान असणारे बसरवाडीचे आदर्श शिक्षक जिवलग मित्र तात्या घुमरे सर, शा.व्य.समिती अध्यक्ष मारूती निकम, ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब पिंपरे, सर्व शाळा व्य.समिती बसरवाडी सरपंच हनुमान उतेकर, उपसरपंच विठ्ठल देवकाते व सर्व ग्रामपंचायत टिम शिऊर,प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय गटविकास अधिकारी प्रकाजी पोळ ,गटशिक्षणाधिकारी प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय कैलास खैरे,जामखेड तालुका सर्व शिक्षक सर्वांचेच खूप खूप अभिनंदन केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here