जामखेड प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्ती आपल्यातीलच आहेत. त्यांना सन्मानाने जगता यावे त्यांना रोजगार मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगाच्या हक्कासाठी लढा देणार असल्याचे प्रहार जनशक्ती संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील आरोळे वस्ती येथील गरजू अंध व्यक्ती यदा यादव यांना इंदराई प्रहार सदन घर भेट देण्यात येणार आले. तसेच दिव्यांग व्यक्तींना कपडे व फळे वाटप करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र प्रहारचे कौतुक होत आहे.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना संतोष पवार म्हणाले की, राजकारणी लोकांनी राजा म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून काम करावे दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वानी काम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी राज्य प्रवक्ते संतोष पवार, महिला प्रदेश अध्यक्ष विमलताई अनारसे, जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी, गुलाब जांभळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भानुदास बोराटे, लक्ष्मण पोकळे, प्रकाश बेरड, देविदास येवले, मालोजी शिकारे, श्रीराम शिंदे, नानासाहेब पारधे , रामभाऊ शिदोरे, सुरेश लांबे, मुकूंद आंधळे, सुदाम निकत गुलाब जांभळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, शहर अध्यक्ष नय्युमभाई शेख , तालुका संघटक शिवाजी सातव, भिमराव पाटिल,संदिप भुजबळ, कांतीलाल कवादे, गणेश हगवणे, दिनेश राळेभात, विष्णु शिंदे, सुरेश धुमाळ, नवनाथ क्षिरसागर ,सचिन उगले, बंडू उगले, अंकुश राळेभात सर, विधाते मँडम ,शबनम सय्यद,स्नेहा शिंदे, शेळके मॅडम आदी महिला आघाडी जनशक्ती पक्ष, दिव्यांग सेल प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार सैनिक कल्याण संघ, जामखेड तालुका यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयसिंग उगले यांनी तर आभार शिवाजी सातव यांनी मानले.